Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातून सुरु झालेली मैत्री अखेरीस लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. या जोडीने आधी आपल्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांना एकत्र पाहून चाहतेही खुश झाले होते. आता अखेर ते दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. अमृता-प्रसादच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
कुटुंबियांच्या व सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींच्या उपस्थितीत अमृता-प्रसादचा लग्नसोहळा थाटामाटात संपन्न झाला. त्यांच्या लग्नाआधीचे हळदीचे, संगीत सोहळ्याचे अनेक फोटोस सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघांच्या लग्नाच्या फोटोंचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यानंतर आता त्यांच्या लग्नानंतरचे या नवविवाहित जोडप्याचे पहिल्यांदा फोटो समोर आले आहेत.
प्रसाद व अमृताच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेवेळचा फोटो समोर आला असून यांत नववधूचा लूक पाहणं रंजक ठरतंय. यावेळी अमृताने हिरव्या रंगाची साडी नेसली असून हातातील हिरव्या बांगड्या आणि केसांत मळलेला गजरा लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय अमृताच्या आईने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जावयाचं व लेकीचं स्वागत करताना काही खास फोटो शेअर केले होते. अमृता व प्रसाद लग्नानंतर पहिल्यांदाचं अमृताच्या घरच्या देवाचे व आई वडिलांचे आशीर्वाद घ्यायला गेले होते. यावेळी अमृताच्या आईने जावयाचं औक्षण करत व गुलाबाचं फुल देत स्वागत केलं. जावयासह त्यांनी लेकीचाही पाहुणचार केलेला पाहायला मिळाला.

प्रसाद-अमृताचा लग्नाचा लूक पाहता ही जोडी नजर लागण्याइतकी सुंदर व लक्षवेधी दिसत होती शिवाय त्यांच्या हळदी व संगीत सोहळ्यातील लूकचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यांच्या त्यांच्या लग्नाचं सांगीतिक पद्धतीने पत्रिकेद्वारे पाहुणे मंडळींना आमंत्रण दिलं होतं. तळेगाव, पुणे येथील एका फार्महाऊसवर त्यांचा विवाह सोहळा पार पडला.