शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“असे खडूस-अप्पू होणे नाही”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पूचा शेवटचा निरोप; भावुक व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 20, 2023 | 7:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
thipkyanchi rangoli fame appu actress dnyanada ramtirthkar shared emotionol video on her instagram account

"असे खडूस-अप्पू होणे नाही", 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील अप्पूचा शेवटचा निरोप; भावुक व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेचे कथानक हे एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित होते. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. अप्पूचा अल्लडपणा व शशांकचा समजूतदारपणा यामुळे ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. अप्पू-शशांक व्यतिरिक्त मालिकेतील इतर कलाकारांनीदेखील प्रेक्षकांची मनं जिंकली.  

मालिकेतील अप्पू म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. आदर्श सून कशी असावी याच उत्तम उदाहरण तिने प्रेक्षकांसमोर आणलं. दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांबरोबर सोशल मीडियाद्वारे काही भावुक क्षण शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dnyanada Ramtirthkar (@dnyanadaramtirthkar)

आणखी वाचा – “पैलवान लवकरच दिसणार नव्या भूमिकेत?”, ‘सुख म्हणजे’ फेम अभिनेता कपिल होनरावच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “भेटू लवकरचं…”

अशातच मालिकेतील अप्पू अर्थात ज्ञानदाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती वाड्यातील रांगोळीला नमस्कार करत आहे आणि भावुकही झाली आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने “साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण” असं कॅप्शन दिलं आहे. तसंच यापुढे “मी तुमच्या सगळ्यांची लाडकी अप्पू निरोप घेत आहे” असं देखील म्हटलं आहे.

आणखी वाचा – Ind VS Aus : अंतिम सामन्यावरून अभिनेता गश्मीर महाजनीचा अमिताभ बच्चन यांना टोमणा, म्हणाला, लपून मॅच पाहिली म्हणून…

दरम्यान या व्हिडीओखाली ज्ञानदाच्या अनेक चाहत्यांनी तसेच अनेक कलाकारांनी कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. अभिनेते अभिजीत खांडकेकर व उदय टीकेकर यांनी “आमचं मनोरंजन करण्यासाठी धन्यवाद” म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. तर अभिनेत्री सारिका नवाथे, गौरी कुलकर्णी यांनी “तू खूप छान काम केलंस” अशा कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर मालिकेच्या व अप्पूच्या चाहत्यांनीदेखील “आम्ही तुला खूप मिस करू” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

Tags: dnyanada ramtirthkarmarathi actressmarathi entertainmentMarathi newsthipkyanchi rangoli
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sukhada Khandkekar shared a letter

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला बक्षीसरुपी पत्र मिळताच झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली, "डबडबलेल्या डोळ्यांनी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.