मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ind VS Aus : अंतिम सामन्यावरून अभिनेता गश्मीर महाजनीचा अमिताभ बच्चन यांना टोमणा, म्हणाला, लपून मॅच पाहिली म्हणून…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 21, 2023 | 1:47 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actor gashmeer mahajani shared instagram story about amitabh bachchan secretly watched india vs australia final match

कोल्हापुरी मिसळीवरून केलेल्या संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेने वेधलं लक्ष, म्हणाला, "तुला पाहिलं की..."

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या काल (१९ नोव्हेंबर) झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया या संघाने भारताचा पराभव करत विजय मिळवला. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्याने तमाम क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४३ षटकांतच पूर्ण केलं आणि भारताचा पराभव झाला.

यावर सामान्य जनतेबरोबरच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. तर अनेकांनी भारतीय संघाला पाठिंबा दर्शवला. अशातच या सामन्याबद्दल अभिनेता गश्मीर महाजनीने केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली. त्याने थेट बिग बींचा उल्लेख करत इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – कोल्हापुरी मिसळीवरून केलेल्या संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेने वेधलं लक्ष, म्हणाला, “तुला पाहिलं की…”

गश्मीरने “बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली” अशी गंमतीशीर स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. यासोबत त्याने दोन इमोजीदेखील पोस्ट केले होते. या स्टोरीचा संदर्भ असा आहे की, विश्वचषक स्पर्धा २०२३च्या उपांत्य सामन्यात भारत व न्यूझीलंड हे दोन संघ एकेमकांविरुद्ध लढले होते. या सामन्यात भारताने ७० धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तेव्हा अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर “जेव्हा मी सामना पाहत नाही, तेव्हा आपण जिंकतो,” असं म्हटलं होतं. यावरूनच गश्मीरने ही गंमतीशीर पोस्ट केली आहे.

आणखी वाचा – साडीमध्ये दिसणारी ‘आई कुठे काय करते’मधील मधुराणी प्रभुलकरने ड्रेसिंग स्टाइलसह संपूर्ण लूकच बदलला, सुकन्या मोने म्हणतात, “तू खूप…”

गश्मीरने या स्टोरीआधी लेक व्योमचा एक फोटो शेअर करत ‘गो इंडिया गो’ म्हणत भारतीय संघाला पाठिंबा दर्शवला होता. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्व सामने जिंकून भारताने अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने २४१ धावांचं आव्हान ४ गडी गमावून पूर्ण केलं आणि भारताला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला.

Tags: entertainment newsgashmeer mahajanimarathi actormarathi entertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Kapil Honrao New Entry

"पैलवान लवकरच दिसणार नव्या भूमिकेत?", 'सुख म्हणजे' फेम अभिनेता कपिल होनरावच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, "भेटू लवकरचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.