शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : नवऱ्याला मिळत असलेली प्रसिद्धी अंकिता लोखंडेला सहन होईना, सलमान खानने खडसावल्यावर म्हणते, “कदाचित…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 18, 2023 | 11:58 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
ankita lokhande inscure with husband Vicky jain popularity

ankita lokhande inscure with husband Vicky jain popularity

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिऑलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुरुवातीपासूनच ‘बिग बॉस’च्या घरात वादावादी पाहायला मिळाल्यामुळे हा कार्यक्रम पहिल्यापासूनच चांगला चर्चेत राहिला. या सीजनमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा नवरा विकी जैन हे जोडपं देखील झालं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून या जोडप्यांमध्ये बरीच भांडणं पाहायला मिळाली. सध्याच्या भागात अंकिता बरीच त्रस्त असलेली पाहायला मिळाली. ती विकीबाबत सलमानकडे तक्रारही करताना दिसली. विकी तिला वेळ देत नसल्याचं तिने सलमानला सांगितलं. याच मुद्द्यावर सलमानने तिची चांगलीच कानउघडणी केलेली दिसली. (ankita lokhande inscure with husband Vicky jain popularity)

आठवड्याच्या शेवटी सलमनाने अंकिताला थेरपी रुममध्ये बोलवून घेत या विषयावर बोलताना दिसला. सलमानने तिला प्रश्न विचारले की, ‘विकी त्याचा खेळ खेळतो आहे तर तू तुझा गेम का खेळत नाही?’ त्याचबरोबर अंकिताला असाही प्रश्न विचारला, ‘विकी सगळीकडे दिसून येत आहे त्यामुळे तू अस्वस्थ झाली आहेस का? ‘

Forget #AnkitaLokhande didi being insecure of other contestants she is a kind of women who is insecure of her own husband.
I mean I haven't sen such contestant who is insecure of better-half/lover in the show BB.
As a player #VickyBhaiya >>>>#BiggBoss17 #MannaraChopra

— Jaanu (@jahnavi__jaanu) November 17, 2023

आणखी वाचा – तमन्ना भाटिया व विजय वर्मा लवकरच अडकणार विवाहबंधनात?, आई-वडिलांच्या दबावामुळे घेतला निर्णय कारण

त्यानंतर सलमान तिला थेट सांगताना दिसला की, “तू तुझ्या नवऱ्याला कार्यक्रमात मिळत असलेली लोकप्रियता पाहून असुरक्षित होत आहेस”. यावर अंकिता उत्तर देत म्हणते, “कदाचित तसं असेल”. अंकिताच्या या उत्तरावर तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जात आहे. एका नेटकऱ्याने तर, ‘अंकिता दीदीला इतर स्पर्धकांपासून कुठे असुरक्षित वाटणार तिला तर स्वतःच्याच नवऱ्यापासून या शोमध्ये असुरक्षित वाटतं’.

It's #AnkitaLokhande, she's the problem in their relationship. She needs more attention, she don't want her husband to do well in the show so that she can shine in the season.

She's insecure of her own husband. Such a pathetic lady!!

Accept it or not!!#VickyJain >>>>… pic.twitter.com/AqA4m2JBey

— Fizzzzz ???? (@ImSfizzaa) November 17, 2023

आणखी वाचा – “त्याला जिंकवण्यासाठी…”, ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनच्या रनरअपचा १९ वर्षांनंतर मोठा खुलासा, अभिजीतचा उल्लेख करत म्हणाला, “केवळ प्रसिद्धी…”

दुसरा नेटकरी लिहीतो, ‘अंकिता या शोमध्ये स्वतःकडे सगळ्यांचं लक्षवेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तिला या शोमध्ये नवऱ्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. तिला तिच्या नवऱ्यापासूनच असुरक्षितता वाटत आहे. हे खूप चुकीचं आहे’. आणखी एका नेटकऱ्याने लिहीलं, ‘अंकिता लोखंडे या कार्यक्रमात खूप असुरक्षित वाटून घेत आहे. तिला तिच्या नवऱ्याच्या खेळासाठी आनंद व्यक्त करायला हवा होता. पण तिने हे  सुरुवातीलाच सांगितलं होतं की, ती विकीला या कार्यक्रमात स्वतःसाठी घेऊन आली आहे. विकीला तिच्या हातातील बाहुली बनवुन तिला ठेवायचं होतं. पण तो आता तस वागत नसल्यामुळे अंकिताला ते बघवत नाही आहे’. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येताना दिसत आहेत.    

Tags: ankita lokhandebigg boss 17salman khanvicky jainweekend ka vaar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage

Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding : संगीत सोहळ्यामध्ये अमृता-प्रसादचा रोमँटिक डान्स, होणाऱ्या बायकोसाठी केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे सर्वत्र होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.