छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिऑलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुरुवातीपासूनच ‘बिग बॉस’च्या घरात वादावादी पाहायला मिळाल्यामुळे हा कार्यक्रम पहिल्यापासूनच चांगला चर्चेत राहिला. या सीजनमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा नवरा विकी जैन हे जोडपं देखील झालं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून या जोडप्यांमध्ये बरीच भांडणं पाहायला मिळाली. सध्याच्या भागात अंकिता बरीच त्रस्त असलेली पाहायला मिळाली. ती विकीबाबत सलमानकडे तक्रारही करताना दिसली. विकी तिला वेळ देत नसल्याचं तिने सलमानला सांगितलं. याच मुद्द्यावर सलमानने तिची चांगलीच कानउघडणी केलेली दिसली. (ankita lokhande inscure with husband Vicky jain popularity)
आठवड्याच्या शेवटी सलमनाने अंकिताला थेरपी रुममध्ये बोलवून घेत या विषयावर बोलताना दिसला. सलमानने तिला प्रश्न विचारले की, ‘विकी त्याचा खेळ खेळतो आहे तर तू तुझा गेम का खेळत नाही?’ त्याचबरोबर अंकिताला असाही प्रश्न विचारला, ‘विकी सगळीकडे दिसून येत आहे त्यामुळे तू अस्वस्थ झाली आहेस का? ‘
Forget #AnkitaLokhande didi being insecure of other contestants she is a kind of women who is insecure of her own husband.
— Jaanu (@jahnavi__jaanu) November 17, 2023
I mean I haven't sen such contestant who is insecure of better-half/lover in the show BB.
As a player #VickyBhaiya >>>>#BiggBoss17 #MannaraChopra
त्यानंतर सलमान तिला थेट सांगताना दिसला की, “तू तुझ्या नवऱ्याला कार्यक्रमात मिळत असलेली लोकप्रियता पाहून असुरक्षित होत आहेस”. यावर अंकिता उत्तर देत म्हणते, “कदाचित तसं असेल”. अंकिताच्या या उत्तरावर तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जात आहे. एका नेटकऱ्याने तर, ‘अंकिता दीदीला इतर स्पर्धकांपासून कुठे असुरक्षित वाटणार तिला तर स्वतःच्याच नवऱ्यापासून या शोमध्ये असुरक्षित वाटतं’.
It's #AnkitaLokhande, she's the problem in their relationship. She needs more attention, she don't want her husband to do well in the show so that she can shine in the season.
— Fizzzzz ???? (@ImSfizzaa) November 17, 2023
She's insecure of her own husband. Such a pathetic lady!!
Accept it or not!!#VickyJain >>>>… pic.twitter.com/AqA4m2JBey
दुसरा नेटकरी लिहीतो, ‘अंकिता या शोमध्ये स्वतःकडे सगळ्यांचं लक्षवेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तिला या शोमध्ये नवऱ्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. तिला तिच्या नवऱ्यापासूनच असुरक्षितता वाटत आहे. हे खूप चुकीचं आहे’. आणखी एका नेटकऱ्याने लिहीलं, ‘अंकिता लोखंडे या कार्यक्रमात खूप असुरक्षित वाटून घेत आहे. तिला तिच्या नवऱ्याच्या खेळासाठी आनंद व्यक्त करायला हवा होता. पण तिने हे सुरुवातीलाच सांगितलं होतं की, ती विकीला या कार्यक्रमात स्वतःसाठी घेऊन आली आहे. विकीला तिच्या हातातील बाहुली बनवुन तिला ठेवायचं होतं. पण तो आता तस वागत नसल्यामुळे अंकिताला ते बघवत नाही आहे’. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येताना दिसत आहेत.