‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. यापैकीच एक कलाकार म्हणजे ओंकार राऊत. ओंकारने आजवर त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ओंकार राऊतला महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे अफाट लोकप्रियता मिळाली. अभिनयाची उत्तम जाण व विनोदाचं अचूक टायमिंग साधत ओंकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. अभिनयाबरोबरच ओंकार सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय असतो. ओंकारनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टची तुफान चर्चा रंगली आहे. (Onkar Raut Relationship)
ओंकारने इंस्टाग्राम अकाऊंटवरून नुकतीच एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ओंकारने “कोणाला बरं द्यावं हे गुलाब?”, असं म्हणत गुलाबाचं फुल हातात घेऊन फोटो शेअर केला आहे. सध्या त्याच्या या फोटोची आणि फोटोला दिलेल्या कॅप्शनची चांगलीच चर्चा रंगली आहे. ओंकारने गुलाबाचं फुल कोणाला देऊ असं म्हणत फोटो पोस्ट केला असल्याने या फोटोवर अनेकांनी कमेंट करत त्यांची फिरकी घेतली असल्याचं पाहायला मिळतंय.
ओंकारच्या या फोटोवर चाहत्यांसह अनेकांनी कमेंट केल्या आहेत. प्रथमेश शिवलकरने यावर कमेंट करत म्हणत आहे की, “मी सांगू का?” यावर प्रतिउत्तर देतं “सांग रे घाबरायचं काय!!!” असं म्हणत ओंकारने कमेंट केली आहे. तर शुभंकर तावडेने “लिस्ट पाठवू का?” असं म्हणत त्याची शाळा घेतली आहे. तर अनेकांनी ओंकारच्या या फोटोवर प्रियदर्शनीचं नाव घेतलं आहे. एका युजरने तर, ‘प्रियाला दे माहित आहे तुमचं चालू आहे ते’ अशी कमेंट केली आहे.

याआधी ही प्रियदर्शनी व ओंकारच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता प्रियदर्शिनी आणि ओंकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिनेत्री वनिता खरात आणि सुमित लोंढे यांच्या लग्नाच्या वेळी ओंकार राऊतसह प्रियदर्शिनीने एक फोटो शेअर केला, यात प्रियदर्शनी व ओंकार यांच्या हटके पोजमुळे सोशल मीडियावर चांगलीच रंगली. प्रियदर्शनीने ओंकारच्या छातीवर हात ठेवून हा फोटो काढला होता त्यामुळे या फोटोवरुन अनेक चाहत्यांनी प्रियदर्शिनी ओंकारमध्ये नेमकं काय असंही विचारलं होतं.