शनिवार, ऑगस्ट 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हे गुलाब कोणाला बरं द्यावं?”, ओंकार राऊतच्या प्रश्नावर चाहत्यांनीच दिलं उत्तर, म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 16, 2023 | 11:28 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Onkar Raut Relationship

"हे गुलाब कोणाला बरं द्यावं?", ओंकार राऊतच्या प्रश्नावर चाहत्यांनीच दिलं उत्तर, म्हणाले...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. यापैकीच एक कलाकार म्हणजे ओंकार राऊत. ओंकारने आजवर त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ओंकार राऊतला महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे अफाट लोकप्रियता मिळाली. अभिनयाची उत्तम जाण व विनोदाचं अचूक टायमिंग साधत ओंकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. अभिनयाबरोबरच ओंकार सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय असतो. ओंकारनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टची तुफान चर्चा रंगली आहे. (Onkar Raut Relationship)

ओंकारने इंस्टाग्राम अकाऊंटवरून नुकतीच एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ओंकारने “कोणाला बरं द्यावं हे गुलाब?”, असं म्हणत गुलाबाचं फुल हातात घेऊन फोटो शेअर केला आहे. सध्या त्याच्या या फोटोची आणि फोटोला दिलेल्या कॅप्शनची चांगलीच चर्चा रंगली आहे. ओंकारने गुलाबाचं फुल कोणाला देऊ असं म्हणत फोटो पोस्ट केला असल्याने या फोटोवर अनेकांनी कमेंट करत त्यांची फिरकी घेतली असल्याचं पाहायला मिळतंय.

आणखी वाचा – दक्षिण आफ्रिकेत अजूनही पाहतात ‘तुला पाहते रे’ मालिका, ‘त्या’ मॅसेजने सुबोध भावे भारावला, म्हणाला, “मला नेहमी…”

ओंकारच्या या फोटोवर चाहत्यांसह अनेकांनी कमेंट केल्या आहेत. प्रथमेश शिवलकरने यावर कमेंट करत म्हणत आहे की, “मी सांगू का?” यावर प्रतिउत्तर देतं “सांग रे घाबरायचं काय!!!” असं म्हणत ओंकारने कमेंट केली आहे. तर शुभंकर तावडेने “लिस्ट पाठवू का?” असं म्हणत त्याची शाळा घेतली आहे. तर अनेकांनी ओंकारच्या या फोटोवर प्रियदर्शनीचं नाव घेतलं आहे. एका युजरने तर, ‘प्रियाला दे माहित आहे तुमचं चालू आहे ते’ अशी कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Onkar Raut (@onkar_raut)

आणखी वाचा – अशोक सराफांनी घरातील पाळीव प्राण्याचं ठेवलं आहे हटके नाव, तेजश्री प्रधानने फोटो शेअर करत केला खुलासा

याआधी ही प्रियदर्शनी व ओंकारच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता प्रियदर्शिनी आणि ओंकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिनेत्री वनिता खरात आणि सुमित लोंढे यांच्या लग्नाच्या वेळी ओंकार राऊतसह प्रियदर्शिनीने एक फोटो शेअर केला, यात प्रियदर्शनी व ओंकार यांच्या हटके पोजमुळे सोशल मीडियावर चांगलीच रंगली. प्रियदर्शनीने ओंकारच्या छातीवर हात ठेवून हा फोटो काढला होता त्यामुळे या फोटोवरुन अनेक चाहत्यांनी प्रियदर्शिनी ओंकारमध्ये नेमकं काय असंही विचारलं होतं.

Tags: entertainmentmaharashtrachi hasy jatramarathi actormarathi serialonkar rautOnkar Raut Relationship
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rashmika Mandanna Injury
Entertainment

शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत, आठवडाभर विश्रांतीची गरज, सेट कोसळला आणि…

ऑगस्ट 1, 2026 | 11:01 am
Arbaj Shaikh Father Passes Away
Entertainment

‘सैराट’ फेम अभिनेत्याला पितृशोक; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, रुग्णालयात उपचारादरम्यान…

जुलै 31, 2026 | 11:24 am
Patri Sarkar 1942
Entertainment

इतिहासातील एक धगधगतं पर्व रुपेरी पडद्यावर, क्रांतीची गाथा सांगणाऱ्या ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

जुलै 31, 2026 | 11:22 am
Taarak Mehta ka ooltah chashmah
Entertainment

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनही शूटिंग ठेवलं सुरु, ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

जुलै 31, 2026 | 11:21 am
Next Post
Bigg boss 17 ankita lokhande losses her temper

Bigg boss 17 : ‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिता लोखंडेचं अश्लील कृत्य, स्वतःवरचा ताबा सुटला, अभिषेकबरोबर केलं असं काही की...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.