छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिऑलिटी कार्यक्रम ‘बिग बॉस १७’ दिवसेंदिवस खूप रंजक होत आहे. सध्या या शो मध्ये टप्प्याटप्प्यावर बरेच ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरातील सदस्यांमध्ये होत असलेली भांडणं कार्यक्रमात आणखीनच मनोरंजक बनवताना दिसतात. तसंच आता बिग बॉसच्या घरात आणखी एक कडाक्याचं भांडण पाहायला मिळालं. नुकत्याच एका भागात अंकिता लोखंडे व अभिषेक कुमार यांच्यात जोरदार वादावादी झालेली दिसली. अशातच अंकिताने अभिषेकला चुकीचा इशारा केला. त्यामुळे अभिषेकचा पारा चढलेला पाहायला मिळाला. (Bigg boss 17 ankita lokhande losses her temper)
‘बिग बॉस’च्या घरातील भांडणं आता प्रेक्षकांसाठी काही नवीन नाहीत. आता नवीन भांडण म्हणजे अभिषेक व अंकिताचं यांच्या झालेलं पाहायला मिळालं. त्यावेळी अंकिताने त्याला मधलं बोट दाखवत इशारा केला. त्या प्रकारामुळे अभिषेकचा संयम सुटलेला पाहायला मिळाला. मुळात हा विषय सुरु झाला तो स्वयंपाक घर साफ न केल्यामुळे अंकिताने साफसफाईबाबत विचारणा करायला गेली. यावर अभिषेकने “तुच साफ करत नाहीस” असं सांगत तिला दोष द्यायला सुरुवात केली. यावर अंकिता प्रत्योत्तर देते की, मी तुझ्याबरोबर प्रेमाने बोलते आहे. तु माझ्याशी ओरडून बोलू नको. पण अभिषेकने हे ऐकलं नाही. तो जोर जोरात ओरडतान दिसला. अभिषेक पुढे म्हणाला, “तु स्वतःच कामापासून लांब पळतेस आणि दुसऱ्यांना बोलतेस”.
यासगळ्यात अंकिता व अभिषेक यांच्यातील भांडण खूपच वाढलं. या व्हिडीओत दोघ एकमेकांशी खूप वाईट प्रकारे भांडताना दिसते. त्यात अंकिताने अभिषेकला मधल्या बोटाने इशारा केला. हे पाहाताच अभिषेक चिडत म्हणाला, “तु मला नॅशनल टेलिव्हिजनवर शिवीगाळ केली आहेस”. त्यानंतर त्याने सगळ्यांना या प्रकाराबद्दल ओरडून सांगतो. या सगळ्या प्रकारात विक्कीमध्ये येतो आणि अंकिताला म्हणतो, “तु असं का केलंस ?” यावर अंकिता विकीला, “तु मध्ये येऊ नकोस. मी स्वतः हे सगळं सांभाळेन”, असं सांगते.
यादरम्यान अभिषेक जोरात ओरडत म्हणाला, “जर मी हे असं काम केलं असतं तर इतक्यात घरवाले मला बोलायला आले असते”. त्यानंतर विक्कीने त्याला समजावल्यानंतर अभिषेक शांत झाला. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस’च्या घरात अगदीच ताणाताणीच वातावरण पाहायला मिळत आहे.