रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“औक्षण, पारंपरिक लूक, ढोल ताशांचा गजर अन्…”, दुबईकरांनी जल्लोषात केलं आदेश बांदेकरांचं स्वागत, त्याचक्षणी ‘ती’ व्यक्ती रडली आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 14, 2023 | 1:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aadesh Bandekar In Dubai

"औक्षण, पारंपरिक लूक, ढोल ताशांचा गजर अन्…", दुबईकरांनी जल्लोषात केलं आदेश बांदेकरांचं स्वागत, त्याचक्षणी 'ती' व्यक्ती रडली आणि…

‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. महाराष्ट्रातचं नव्हे तर परदेशातील महिला वर्गालाही या कार्यक्रमाची भुरळ पडली आहे. आदेश बांदेकर पैठणी घेऊन कधी येणार असं सर्वच महिलांना वाटत असतं. आता मात्र परदेशातील महिलावर्गासाठी आदेश बांदेकर परदेशवारीला गेले होते. ‘महाराष्ट्र मंडळ, दुबई’ यांच्या वतीने आयोजित ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमासाठी यंदाच्या दिवाळीत बांदेकर दुबईला पैठणी घेऊन गेले होते. (Aadesh Bandekar In Dubai)

ढोल ताशांच्या गजरात, भव्य जल्लोषात महाराष्ट्राच्या लाडक्या आदेश भाऊजींच दुबईत स्वागत करण्यात आलं. शनिवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२३रोजी दिवाळीच्या पूर्व संध्येला, MPFS दुबई म्हणजेच महाराष्ट्र मंडळ, दुबई येथे सुवर्णपर्व दिवाळी सण साजरा करण्यात आला आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आदेश बांदेकर उर्फ आदेश भावोजी यांनी हजेरी लावली होती. यावेळी भारताप्रमाणेच दुबईतही त्यांचं औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, भव्य जल्लोषात त्यांचं झालेलं स्वागत या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.

आणखी वाचा – आयफेल टॉवर, ट्रेन अन्…; पॅरिसच्या रस्त्यांवर प्रसाद ओक सहकुटुंबिय लुटत आहे सुट्टीचा आनंद, पोस्ट शेअर करत म्हणाला, “पॅरिस…”

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

२०२३ हे MPFS, दुबईचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून आदेश बांदेकर यांच्या “खेळ मांडियेला” या कार्यक्रमाने त्यांचं यंदाचं वर्ष उजळून निघालं. यावेळी या कार्यक्रमात दुबईतील माऊलींना पन्नासावे वर्ष आणि पन्नास पैठण्या जिंकायची संधी मिळाली. यावेळी आदेश बांदेकर म्हणाले, स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं हे माझं तत्व आहे. मी राजकारण कधी करणार नाही माऊली पण समाजकारणाचा मार्ग कधीही सोडणार नाही. म्हणून मी बाळासाहेबांना दिलेला शब्दही मी कधी विसरणार नाही आणि मी कायम उद्धवजींबरोबरचं काम करत राहणार. हे ऐकून एका चाहतीने पुढे येत, तिचं मनोगत मांडत ४० वर्ष अविरतपणे शिवसेनेसाठी काम केल्याचं म्हटलं. यावेळी त्या माऊलीच्या आणि त्यांच्या मुलाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले”.

आणखी वाचा – “नवऱ्याबरोबर फिरायला गेली अन्…”, आईच्या दुसऱ्या लग्नानंतरच्या पाडव्याबाबत सिद्धार्थ चांदेकरचं भाष्य, म्हणाला, “तिच्या आयुष्यात हस्तक्षेप…”

‘खेळ मांडियेला’ कार्यक्रम नुकताच दुबईत पार पडला. यावेळी तेथील चाहत्यांनी आदेश बांदेकर यांचं खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केलेलं पाहायला मिळालं. त्या सोहळ्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Tags: Aadesh Bandekarentertainmentkhel mandiyela in dubaimarathi actormarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
titeeksha and khushboo tawde making biryani and puri diwali special video shared on social media

Video : ‘सातव्या मुलीची…’ फेम तितिक्षा तावडेने आईबरोबर घरीच बनवला स्वयंपाक, पुरी-भाजी, पुलाव अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.