शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Aarti Solanki : “मी आईला घरी बसवलं आणि चॅनलने मला…”, ‘तो’ प्रसंग सांगताना आरती सोळंकीला कोसळलं रडू, म्हणाली, “‘फु बाई फु’मुळे मला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 4, 2023 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aarti Solanki majjacha adda in Marathi

आरती सोलंकी मज्जाचा अड्डा

Aarti Solanki Video : प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. कधी ते अनुभव चांगले असतात तर कधी ते अनुभव वाईट असतात. या सगळ्यातून माणूस काही ना काही शिकत जातो. पण काही असे अनुभव असतात जे आपल्याला पूर्णपणे तोडून ठेवतात. असाच एक अनुभव मराठमोळी विनोदी अभिनेत्री आरती सोळंकीने सांगितला. आजवर आरतीला मनोरंजन क्षेत्रात काम करताना विविध अनुभवांना, अपमानांना सामोरं जावं लागलं. याबाबत नुकताच तिने खुलासा केला. आरती ‘इट्स मज्जा’ चॅनलच्या ‘मज्जाचा अड्डा’ कार्यक्रमात आली होती. त्यावेळी तिने तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. खासगी आयुष्याबद्दल बोलताना तिने तिच्या आईने तिच्यासाठी केलेल कष्ट व त्यांना झालेला त्रास याबाबत भाष्य केलं.(Aarati told mother to not work and channel banned her)

आरतीचे वडिलांना तिच्या आईला सोडल्यानंतर तिच्या आईने त्यांना एकटीने सांभाळलं. याबाबत सांगताना आरती म्हणाली, “आई सकाळीच माश्यांच्या लिलावाला जायची. सकाळचा लिलाव ६.३०ला असायचा त्यामुळे त्याअगोदर तिला घरातून बाहेर पडणं भाग असायचं. त्यांनंतर तिला अगदी शेवटच्या लिलावापर्यंत थांबवं लागायची. कारण मासे खूप यायचे. त्यामुळे तिथे राहणं तिला भाग असायाचं. तेवढा वेळ आई बाहेरच असायची. त्यामुळे आमच्या शिक्षणापासून  आम्हाला शाळेत नेऊन सोडण्यापर्यंत सगळं काही आमचं शेजाऱ्यांनीच केलं”.

आणखी वाचा – Aarti Solanki : “वडिलांचं पहिलं लग्न झालेलं आईला माहितच नव्हतं अन्…”, आरती सोळंकीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाली, “धर्मामुळे दोघांना…”

आरती पुढे सांगते, “या सगळ्या परिस्थितीमुळे मी ती गरीबी बघितली आहे. त्यामुळे मी आजवर माझा स्वाभिमान जपत आले. आतापर्यंतचे मला आलेल्या अनुभवांमध्ये आणि त्या परिस्थितींमध्ये मला ही भीती नाही वाटली की मला चटणी भाकरी खावी लागेल. कारण मी अगोदरपासून चटणीभाकरी खाणारी मुलगी आहे. रोजची बिर्याणी खाणाऱ्याला ही भिती असते. त्याच्यामुळे जेव्हा फु बाई फु मुळे मला चांगले दिवस यायला लागले. त्यानंतर मी ठरवलं की आईला आता काम करु द्यायचं नाही. मी तिला येऊन म्हणाले तु २५ वर्ष बर्फात काम केलं. तु काम करायच नाही. पण ज्यावेळी मला चॅनलनं बॅन केलं तेव्हा मला वाईट वाटलं की इतक्या वर्षांनी जेव्हा मी माझ्या आईला घरी बसवलं आणि तेव्हा तुम्ही मला घरी बसवल”, आरतीने आजवर बऱ्याच प्रसंगांना सामोरी गेली आहे. पण हा प्रसंग सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं.  

आणखी वाचा – Aarti Solanki : जेवण, कपड्यांवरुन हिणावलं, ‘त्या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने तर…; आरती सोळंकीचे धक्कादायक अनुभव, म्हणाली, “जेवायला मिळत नाही म्हणून…”

तिची स्वतःची परिस्थिती स्पष्ट करताना आरती म्हणाली, “तेव्हा माझं असं झालं. की त्यानंतर मी आईला सांगूही शकत नव्हते की तू परत कामाल जा. त्या चॅनलवर  माझा मुळात राग नाही. कारण त्या चॅनलमुळेच मी लोकांपर्यंत पोहोचले. पण माझा यावर राग आहे की माझ्या आईला मी घरी बसवलं आणि यांनी मलाच घरी बसवलं”, हे सांगताना आरतीचे डोळे पाणावले होते.

Tags: aarati SolankiMarathi comedy actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aarti Solanki Video

Aarti Solanki : "ज्या अभिनेत्रीच्या मुलांचे मी लाड केले तिनेच…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबाबत आरती सोळंकीचं मोठं भाष्य, म्हणाली, "तिच आज हिणवते कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.