Aarti Solanki Video : मराठी सिनेसृष्टीतील विनोदाच्या परफेक्ट टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अशी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे आरती सोलंकी. आरतीने आजवर बऱ्याच कार्यक्रमांमधून विविध भूमिकांकर सगळ्यांच मनं जिंकून घेतलं आहे. तिने आपल्या हटके अंदाजाने स्वतःची अशी वेगळी ओळखी निर्माण केली. त्यामुळे तिचं आजही मराठी मनोरंजनसृष्टीत वेगळं स्थान आहे. पण आरतीचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. बराच खडतर प्रवास करत आरती इथपर्यंत पोहोचली आहे. नुकताच तिने ‘इट्स मज्जा’ युट्युब चॅनलच्या ‘मज्जाचा अड्डा’ कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बरीच मिटलेली पानं उलघडली. यावेळी तिने तिची आई व वडिलांबद्दलही सांगितलं तसेच तिची आई मुस्लिम असल्याबद्दलही स्पष्ट केलं.(Aarti Solanki share about her mother and father relation )
आरतीने तिच्या आयुष्यातील बरेच अनुभव शेअर केले. त्यावेळी तिने तिच्या आईबद्दल तेव्हाचं आयुष्य सांगताना म्हणाली , “माझी आई मुळची सोलापूरची गावची आहे. ती कुराण शिकली आहे. त्यामुळे बाकी शिक्षणाचा तिला कोणताही गंध नाही. साथं मीठही किती रुपयाला मिळत हे ही तिला माहित नव्हतं. अशा परिस्थितीत ती मुंबईत आली आणि तिचा माझ्या वडिलांसोबत प्रेमविवाह झाला. तिला माहितही नव्हतं की त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. हे पण माहित नव्हतं की ते हिंदू आहेत. मी काठीयावाडी आहे त्यामुळे आमच्यात दोन लग्न केलीत तर काही प्रोब्लेम नाही. आमच्यामध्ये ते चालतं. आईकडे मुस्लिम असल्यामुळे तिथे ही चालत. खरतर माझी आई बाटलेले मुस्लिम आहेत. हिंदू जे नंतर मुसलमान केले गेले. त्यातली ती पाटील”.
आरती पुढे सांगते, “माझ्या आईकडे अजूनही हिंदू संस्कृती पाळली जाते. माझ्या आईचा गावचा जो वाडा आहे तिथे लक्ष्मीचं मंदिर आहे. आजही तिथे देवीची शुक्रवारची ओटी भरली जाते. माझ्या आईकडे मुस्लमान असून घट पण बसवतात. हिंदूंचे सगळे सण साजरे केले जातात. त्यामुळे माझ्या आईला ही संस्कृती काही वेगळी नव्हती.त्यामुळे माझ्या आईकडून लग्नासाठी कधी विरोध झाला नाही. पण माझ्या वडिलांकडून खूप विरोध झाला. कारण आमचं स्वतःचं देवीचं मंदिर आहे जिथे देवी खूप कडक आहे. तिला बाटलेलं मुस्लमान असणं चालत नव्हतं. त्यामुळे माझ्या वडिलांच्या इथून आम्हाला बराच त्रास झाला. त्यामुळे त्यांना धर्मामुळे वेगळं व्हावं लागलं”.
पुढे आरती म्हणाली, “माझ्या पहिल्या आईनेही कधी सांगितलं नव्हतं की दुसरी बायको का केली? उलट माझी आई आणि पहिली आई बहिणी सारख्या राहत होत्या. फक्त धर्म मधे आला त्यामुळे त्यांच्यात अडचण सुरु झाल्या आणि ते वेगळे झाले”. आरती पुढे परिस्थिती स्पष्ट करताना सांगते, “मी ३ वर्षाचे असताना ते आम्हाला सोडून गेले. असंही नाही की त्यांनी काही हिस्सा दिला. अगदी त्यांनी आम्हाला वाळीत टाकलं होतं. त्यावेळी सगळ्यात मोठा पाठिंबा जो कोणी दिला असेल तर तो चाळीतील लोकांनी दिला. आज आम्ही जो मोठे झालो ते या चाळीतील माणसांमुळेच झालो”, असं सांगत तिने आपल्या आयुष्यातील तो कठीण काळ सगळ्यांसमोर मांडला.