प्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी आजवर विविध पात्र साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट व रिॲलिटी शोज यांमधून त्यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. एकीकडे नाटकांमधून विनोदी भूमिका करत असताना ‘शुभविवाह’ मालिकेत नकारात्मक भूमिकेत काम करत आहेत. लवकरच त्या ‘एकदा येऊन तर बघा’ या विनोदी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. विशाखा अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्या नेहमीच विविध फोटोज व रील्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. काही वेळा त्या चाहत्यांच्या कमेंटवर सडेतोड उत्तर देतानाही दिसल्या. (vishakha subhedar replies her fan on their look)
काही दिवसांपूर्वी विशाखा यांनी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यावर एका चाहतीने जी कमेंट केली, ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशाखा यांनी नुकतंच एका सोहळ्यातील फोटो शेअर केले होते. चंदेरी रंगाचा जॅकेट असलेला ड्रेस, त्यावर केलेली आकर्षक केशभूषा यामध्ये त्या अतिशय सुंदर दिसत आहे. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला असून एका चाहतीने या फोटोवर कमेंटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
हे देखील वाचा – क्रांती रेडकरने घराच्या छतामधून साप बाहेर काढत असलेल्या महिलेचा व्हिडीओ केला शेअर, नेटकऱ्यांना आठवले समीर वानखेडे
ती चाहती यामध्ये म्हणाली, “मी जे लिहिणार आहे, ते वाचून तुला बहुतेक माझा राग येईल. पण मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते, म्हणून न राहवून मी हे लिहीत आहे. तू खोट्या कमेंट्स वाचून स्वतःचे नुकसान करु नको. तू जशी आहेस, तशी छानच दिसते. आणि तुझ्या अभिनयाबद्दल मी काय बोलणार, तू एक उत्तम अभिनेत्री आहेस व ते अनेकदा सिद्ध देखील केलं. पण अशा लूक्स मध्ये तुला बघून कुठेतरी माझ्या मनाला त्रास झाला. तू म्हणशील सगळे एवढे कौतुक करतात आणि ही का असं बोलते. पण खरंच सांगते तुझ्याबद्दल एक अटॅचमेंट वाटते म्हणून मी हे लिहिते. तू राग मानू नकोस.” या कमेंटला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “तुमच्या भावना मी समजू शकते. नसेल आवडलं तुम्हांला, पण यात वाईट काय दिसतंय? ज्याचा तुम्हाला त्रास झाला. मी एका डान्स परफॉर्मन्ससाठी तयार झाले होते, त्याचे कपडे आहे, कारण सुद्धा तशीच मागणी होती.”
हे देखील वाचा – “माणसाचं कर्म चांगलं असलं की…”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली, “त्याला रात्रीची…”

त्यावर ती चाहती पुन्हा कमेंट करत म्हणाली, “खरंतर मला तुला नाव ठेवायचे नव्हते. मात्र ते मला नीट शब्दात मांडता आले नसेल, म्हणून तुझा गैरसमज झाला. असो तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा. माझ्या बोलण्याने तुला जर वाईट वाटलं असेल, तर मला माफ कर बाळा. माझे तुला दुखावण्याचा हेतू नव्हता.’ त्यावर त्यांनी “मला अजिबात वाईट वाटलं नाही. खरंच, तुमचं प्रेम मला समजतं.”, अशी कमेंट केली. त्यांच्या या रिप्लायवर चाहत्यांनी अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव केला.