बॉलिवूडमध्ये सध्या ॲक्शनपॅक चित्रपटांचा ट्रेंड सुरु आहे. अनेक ॲक्शन चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई करत आहे. अशातच आणखी एक ॲक्शनपॅक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या ‘एक था टायगर’ फ्रेंचाईजीमधील तिसरा चित्रपट ‘टायगर ३’ मुळे बराच चर्चेत आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झालं. ज्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. अशात, निर्मात्यांनी चित्रपटाचं नवीन प्रोमो लाँच करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Tiger 3 new promo out)
समोर आलेल्या या प्रोमोमध्ये चित्रपटातील मुख्य पात्र खास ॲक्शनपॅक अंदाजात दिसत आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला सलमान आणि इमरान हाश्मी यांच्यात जोरदार ॲक्शन पाहायला मिळत आहे. शिवाय, धमाकेदार स्टंट्स, डायलॉग्स आणि संगीतही सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कार चेज सीक्वेन्सपासून अभिनेत्याचा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतं. एकूणच चित्रपटाच्या या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता वाढली आहे.
हे देखील वाचा – Bigg Boss 17 : या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून ‘हा’ स्पर्धक बाहेर पडणार, नाव ऐकून प्रेक्षकांनाही बसला धक्का
मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ चं ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं होतं. ज्यात रॉ एजंट टायगरवर देशद्रोहाचे खोटे आरोप लावण्यात आलेले असतात. तरीसुद्धा तो आपल्या देशाला व कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न करतो, हे यात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सेन्सर बोर्डाकडून या चित्रपटाला काही शब्दांचा अपवाद वगळता झीरो कट्ससहित मंजुरी मिळाली. २ तास २२ मिनिटांचा हा चित्रपट असणार आहे.
हे देखील वाचा – “तुला माझा राग येईल पण…”, विशाखा सुभेदारच्या ‘त्या’ ड्रेसमधील फोटोवर चाहतीची कमेंट, अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली, “तुमच्या भावना…”
या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री कतरिना कैफ, इमरान हाश्मी, रेवती, रिद्धी डोगरा, कुमुद मिश्रा, रणवीर शौरी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘यशराज फिल्म्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. जो येत्या १२ तारखेला प्रदर्शित होणार आहे.