शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोला पहिल्यांदा पाहिलं तो दिवस आठवत अविनाश नारकरांनी शेअर केली प्रेमाची आठवण, म्हणाले, “बघितलं पोरी तुला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 27, 2023 | 6:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Avinash Narkar Romantic Post

बायकोला पहिल्यांदा पाहिलं तो दिवस आठवत अविनाश नारकरांनी शेअर केली प्रेमाची आठवण, म्हणाले, "बघितलं पोरी तुला…"

वयाची पन्नाशी ओलांडलेल्या ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. अतिशय निरागस, मनमोहक, लाघवी दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये या अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं. ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या फोटोशूटने, अभिनयाने चाहत्यांना कायमच भुरळ घातली. त्यांच्या फिट दिसण्याचं श्रेय त्या पूर्णतः फिटनेसला देतात. ऐश्वर्या या सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. ऐश्वर्या यांच्या सुंदरतेची भुरळ चाहत्यावर्गामध्येच नसून त्यांच्या पतीलाही पडली होती. (Avinash Narkar Romantic Post)

ऐश्वर्या नारकर यांचे पती अविनाश नारकर हे देखील अभिनेते असून मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. शिवाय ऐश्वर्या यांच्यासह नेहमीच ते ट्रेंडिंग रील बनवून सोशल मीडियावरून शेअर देखील करत असतात. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या जोडप्यात तरुणाईला लाजवेल इतकी एनर्जी आहे. अनेकदा ते या वयात ट्रेंडिंग रील शेअर केल्याने नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकतात. मात्र ऐश्वर्या नेटकऱ्यांच्या प्रश्नाला वेळोवेळी उत्तरं देत त्यांच्यावर पलटवार करतात. नुकतीच ही जोडी रोमँटिक डेटवर देखील गेली होती, याचा व्हिडीओ ऐश्वर्या यांनी शेअर देखील केला आहे.

आणखी वाचा – Video : ऐश्वर्या-अविनाश नारकर यांची रोमँटिक डेट, एकमेकांच्या प्रेमात बुडालं मराठमोळं जोडपं, अभिनेत्री म्हणते, “त्याला ट्रोल करतात…”

View this post on Instagram

A post shared by Avinash Narkar (@avinash.narkar)

आता त्यांच्या या रोमँटिक डेटनंतर अविनाश यांना २७ वर्षांपूर्वी ऐश्वर्या यांच्या प्रेमात पडलेले दिवस आठवत आहेत. याचा एक व्हिडीओ नुकताच त्यांनी इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. “बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा पहिल्यांदा, मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा, स्लो मोशन झालंय पहिल्यांदा, पहिल्यांदा, पहिल्यांदा” या गाण्यावर अविनाश यांनी उत्तम अभिनय करत आणि हे गाणं गुणगुणत २७ वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा बायकोला पाहिलं तो दिवस आठवला. त्यांनी या व्हिडिओवर असंही लिहिलं आहे की, तो दिवस आठवला ज्या दिवशी मी तिला प्रपोज केलं होतं.

आणखी वाचा – “खूप चढ-उतार, सुख-दुःख पाहिले पण…”, अश्विनी महांगडेसाठी बॉयफ्रेंडची खास पोस्ट, म्हणाला, “आठ वर्षांपूर्वी…”

या व्हिडीओसह त्यांनी कॅप्शन देत असंही म्हटलं आहे की, “२७ वर्षे झाली. वेळ पटकन निघून गेला. फक्त आठवणी तयार करा आणि आयुष्याचा आनंद घ्या. मी ही ऐश्वर्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हां माझंही असंच काहीसं झालं होतं…!! आईशप्पथ…!!” असं म्हणत त्यांनी त्यांच्या प्रेमाच्या दिवसांची आठवण काढली.

Tags: aishwarya narkaravinash narkarAvinash Narkar Romantic Postentertainmentmarathi actormarathi actressmarathi malikamarathi serialromantic post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shyamchi Aai Trailer Out

माय-लेकाचं नातं, स्वातंत्र्यपूर्व काळ अन्…; 'श्यामची आई' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांकडून होत आहे कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.