बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ऐश्वर्या-अविनाश नारकर यांची रोमँटिक डेट, एकमेकांच्या प्रेमात बुडालं मराठमोळं जोडपं, अभिनेत्री म्हणते, “त्याला ट्रोल करतात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 27, 2023 | 12:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar On Husband

Video : ऐश्वर्या-अविनाश नारकर यांची रोमँटिक डेट, एकमेकांच्या प्रेमात बुडालं मरोठमोळं जोडपं, अभिनेत्री म्हणते, “त्याला ट्रोल करतात…”

मराठी सिनेसृष्टीतील एव्हरीग्रीन जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर. कलाकार म्हणून गेली अनेक वर्ष ही जोडी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. त्यांच्या कामाबरोबर ही जोडी सोशल मीडियावर देखील विशेष चर्चेत असते. ही जोडी ट्रेंडिंग रिल, विविध व्हिडीओ तसेच योगा करतानाचे व्हिडीओ शेअर करताना नेहमीच दिसतात. वयाची पन्नाशी ओलांडली तरी आजही त्यांचा तो उत्साह, काळानुसार पुढे जाण्याची वृत्ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते. (Aishwarya Narkar On Husband)

रिल व्हिडीओवरुन या जोडीला ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागलेला आहे. एखादा डान्स व्हिडीओ, वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला तरीही नेटकरी नकारात्मक कमेंट करून त्यांना खडेबोल लगावताना दिसतात. यावर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी कित्येकदा भाष्य करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तरे दिली आहेत. आता ही एव्हरग्रीन जोडी प्रेमात आकंठ बुडाली आहे. नुकताच ऐश्वर्या व अविनाश यांचा एक रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

आणखी वाचा – “एवढं किंचाळण्यापेक्षा…”, ‘वदनी कवळ’ श्लोक वेडं-वाकडं म्हणण्यावरुन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर भडकले नेटकरी, म्हणाले, ” निदान सेलिब्रिटींनी…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

अविनाश व ऐश्वर्या दोघेही डेटवर गेले असल्याचा हा रोमँटिक व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचं एकमेकांवर असणार निखळ प्रेम, विश्वास व आदर पाहायला मिळतोय. ही डेट ऐश्वर्या यांनी अविनाश यांच्यासाठी घडवून आणलेली कॅप्शनवरून कळतेय. ऐश्वर्या यांनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन देत म्हटलं आहे की, “तुझ्यासारखं आश्वासक व काळजी घेणारं कुटुंब मिळाल्याबद्दल मी नेहमीच ऋणी आहे. या प्रेमळ हृदयाच्या माणसाबरोबर मी आहे हा मला मिळालेला एक आशीर्वादचं म्हणायला हवा. हा ‘माणूस’ असा आहे जो केवळ स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत नाही तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा गरजू अशा जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारतो. हे नक्कीच सोप्प नाही.”

आणखी वाचा – “याचा पूर्णपणे दोष…”, सलग तीन फ्लॉप चित्रपटांवर रणवीर सिंहचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाला, “या काळात मी खूप…”

“जेव्हा नेटकरी त्याला ट्रोल करतात तेव्हा मला मनापासून असं वाटत की, ट्रोल करण्याआधी तो माणूस म्हणून कसा आहे हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. सुखी, भाग्यवान माणूस. प्रत्येक सजीव सृष्टीचा आदर करा मग काहीही असो. तू एक दुर्मिळ रत्न आहेस !!! सदैव आशीर्वादित रहा.” असं म्हणत ऐश्वर्या यांनी पतीची स्तुतीपर पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होताना दिसतोय.

Tags: Aishwaraya NarkarAvinash and Aishwarya Narkar New Reelavinash narkarentertainmentmarathi actormarathi couplemarathi malikamarathi moviemarathi serialromantic date
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Aditi rao hydari divorced after two years of marriage

२१व्या वर्षी लग्न, दोन वर्षामध्ये घटस्फोट अन्…; चार वर्ष अफेअर असूनही अदिती राव हैदरला लाभलं नाही वैवाहिक सुख, म्हणाली, "लग्नाच्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.