शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खूप चढ-उतार, सुख-दुःख पाहिले पण…”, अश्विनी महांगडेसाठी बॉयफ्रेंडची खास पोस्ट, म्हणाला, “आठ वर्षांपूर्वी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 27, 2023 | 3:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashvini Mahangade Birthday

“खूप चढ-उतार, सुख-दुःख पाहिले पण...”, अश्विनी महांगडेसाठी बॉयफ्रेंडची खास पोस्ट, म्हणाला, “आठ वर्षांपूर्वी...”

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनघा म्हणजेच अश्विनी महांगडेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. अभिनेत्री अश्विनी महांगडेला या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. मालिकेबरोबरच अश्विनी चित्रपटातूनही अधूनमधून भेटीस येत असते. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचंही बरंच कौतुक झालं. शिवाय अश्विनी चर्चेत असते ते तिच्या पारंपारिक वेशातील फोटोशूटमुळे. काही महिन्यांपूर्वी अश्विनीच्या खऱ्या जोडीदाराचे फोटो समोर आले होते. (Ashvini Mahangade Birthday)

अशातच आज अश्विनीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराने तिला सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. अश्विनीबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने कॅप्शन देत म्हटलं आहे की, “या आपल्या आठ वर्षांच्या प्रवासात खुप चढ-ऊतार, सुख-दुखः पाहीले, खुप लोकांचा सहवास लाभला, काहींनी जोडून ठेवले तर काहींनी तोडले पण त्यातूनही कायम राहिले ते आपण ८ वर्षांपूर्वी जोडलेले नातं. आईने सांगितल्याप्रमाणे माणूस नेहमी मोठा असायला हवा आणि ते कायम जपायला हवे. नानांना दिलेल्या शब्दांपासून कधी मागे हटणार नाही, कायम तुझ्या बरोबर आहे. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा बछडी, लव्ह यु. खुप मोठी हो. तिला बोलायला आवडते आणि मला ऐकायला” असं कॅप्शन दिलं आहे.

आणखी वाचा – अभिनेते विद्याधर जोशी अजूनही करत आहेत नोकरी, मोठ्या आजाराने होते त्रस्त, म्हणालेले, “दोन्ही फुफुस ८० ते ८५ टक्के निकामी झाले अन्…”,

View this post on Instagram

A post shared by Nɪʟᴇsʜ Jᴀɢᴀᴅᴀʟᴇ (@neel_beyondtheworld)

“आधार देणाऱ्याचे मन निर्मळ असावे आणि ते अनेक संकटांमधून गेल्यावरच समजते…” असे कॅप्शन देत अश्विनीने काही दिवसांपूर्वी तिच्या जोडीदाराबरोबरचे फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. तिला आधार देत कायम तिची साथ करणाऱ्या या तिच्या जोडीदाराचे नाव आहे नीलेश जगदाळे. नीलेश हे फार्मफ्रेश ऑरगॅनिकचे मालक आहेत. याबरोबरच त्यांनी अश्विनीसोबत मिळून ‘फ्लाइंग एन्जल लेट्स फ्लाय’ ही कंपनी देखील सुरू केली आहे. तसेच ‘रयतेचे स्वराज्य’ प्रतिष्ठानचे ते सदस्यही आहेत तिथे अश्विनीही सदस्य आहे.

आणखी वाचा – “स्त्रिया फक्त सेक्ससाठी नसतात” रावण दहनावरून कंगना रणौतचं सुब्रमण्यम स्वामी यांना सडेतोड उत्तर, म्हणाली, “राजकारणात आपली…”

आज अश्विनीच्या वाढदिवसानिमित्त निलेश यांनी खास पोस्ट करत अश्विनीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्ट वर अनेक चाहत्यांनीही अश्विनीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर निलेशच्या या पोस्टवर अश्विनीने कमेंट करत ‘लव्ह यु बाबा’ असं म्हटलं आहे.

Tags: ashvini mahangadeashvini mahangade aai kuthe kay karteashvini mahangade birthdayashvini mahangade boyfriendentertainmentmarathi actressmarathi malikamarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Anuradha paudwal life incident

पतीचं निधन, तरुण लेकालाही गमावलं अन्…; पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, तेव्हा काय घडलं होतं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.