शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

माय-लेकाचं नातं, स्वातंत्र्यपूर्व काळ अन्…; ‘श्यामची आई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांकडून होत आहे कौतुक

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 27, 2023 | 7:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shyamchi Aai Trailer Out

माय-लेकाचं नातं, स्वातंत्र्यपूर्व काळ अन्…; 'श्यामची आई' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांकडून होत आहे कौतुक

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत ज्या चित्रपटाची चर्चा होत आहे, त्या ‘श्यामची आई’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्याचे दिग्दर्शन ‘शाळा’ फेम दिग्दर्शक सुजय डहाके यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं फर्स्ट लुक आणि टीझर समोर आलं होतं. आता या चित्रपटाचं ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं. साने गुरुजी यांनी ‘श्यामची आई’ ही अजरामर कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीवर आजवर अनेक कलाकृती समोर आल्या आहे. १९५३ मध्ये जेव्हा यावर पहिल्यांदा हा चित्रपट आला, तेव्हा त्याने राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. आता याच कादंबरीवर हा चित्रपट एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Shyamchi Aai Trailer Out)

“माझ्या पुस्तकात आहे एक आश्रम, तिथे या वेड्या-बागड्या श्यामच्या गोष्टी ऐकायला जमतात आश्रमवासी. असे लिहितो मी या पुस्तकात.” हा डायलॉग आणि पुढे ‘श्यामची आई’ असं लिहीत या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. पुढे श्याम व त्याच्या खंबीर आणि मायाळू स्वभावाची आई यांच्या नात्यांचा उलगडा, श्यामला शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी आई, प्लेगची साथ, श्यामच्या कुटुंबीयांची इंग्रजांविरोधातील लढाई, पुढे साने गुरुजींचं तुरुंगवासातील काळ आणि त्या काळात लिहिलेली कादंबरी हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण चित्रपट ‘ब्लॅक अँड व्हाईट’ स्वरूपात असणार आहे.

हे देखील वाचा – बायकोला पहिल्यांदा पाहिलं तो दिवस आठवत अविनाश नारकरांनी शेअर केली प्रेमाची आठवण, म्हणाले, “बघितलं पोरी तुला…”

View this post on Instagram

A post shared by Shyamchi Aai Film श्यामची आई (@shyamchiaaifilm)

साने गुरुजींच्या भूमिकेत अभिनेता ओम भुतकर आपल्याला दिसणार आहे. बालकलाकार शर्व गाडगीळ छोट्या श्यामची, अभिनेत्री गौरी देशपांडे श्यामच्या आईची, तर संदीप पाठक श्यामच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव व अन्य कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील संवाद, कलाकारांचा अभिनय व लूक्स सर्वांचे लक्ष वेधत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

हे देखील वाचा – Video : स्विमिंग पूलमध्ये फेकलं, धबधब्याखाली धमाल अन्…; ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील कलाकारांची धमाल ट्रीप, व्हिडीओ तुफान व्हायरल

चित्रपटाची पटकथा सुनील सुकथनकर यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांनी केलं आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर येत्या १० नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.

Tags: shyamchi aaiShyamchi Aai movie TrailerShyamchi Aai Trailer Outupcoming marathi movie
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Bhau Kadam Kokan Village

Video : ५० वर्ष जुने घर, आकर्षक जागा अन्…; असं आहे भाऊ कदम यांचं कोकणातील घर, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.