‘बिग बॉस १७’च्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वात अंकिता लोखंडे आणि विकी जैन बिग बॉस १७च्या घरात स्पर्धक म्हणून पाहायला मिळत आहेत. बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्यांच्यात सुरु झालेल्या वादांमुळे त्यांचे मार्ग वेगळे होताना दिसत आहेत. दोघांच्यात झालेला वाद पाहता या दोन्ही स्पर्धकांच्या चाहत्यांमध्ये दुःखाचं वातावरण पसरलं आहे. शोमध्ये गेल्यानंतर हे स्पर्धक इतर स्पर्धकांसह वैयक्तिक व व्यावसायिक गोष्टी शेअर करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. (Ankita Lokhande On Baby Planning)
‘बिग बॉस १७’च्या घरातील गार्डन परिसरात विश्रांती घेत असताना अंकिताने ‘बिग बॉस’ शो स्वीकारण्यामागचं खरं कारण सांगत म्हणाली, ““विकीमुळे मी ‘बिग बॉस’ करण्यासाठी तयार झाले. त्याला हा शो खूप आवडतो आणि घरी विकी नेहमी हा शो बघत असतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून त्याला या शोमध्ये स्पर्धक म्हणून येण्याची इच्छा होती. फक्त त्याच्यामुळे हा शो करण्याचा मी निर्णय घेतला.”
याशिवाय अभिनेत्रीने असंही सांगितलं की, बिग बॉसच्या घरात तिने या वर्षी येण्याचा निर्णय घेतला कारण तिला पुढील वर्षी बेबी प्लॅनिंग करायचं आहे. अंकिताने यावर्षी हा शो पूर्ण करून पुढच्यावर्षी आम्ही बाळाच्या प्लॅनिंगचा विचार करू असं म्हटलं. तसेच या शोमध्ये आली नसती तर तिने आताच बाळाचा विचार केला असता, असंही नमूद केलं.
आणखी वाचा – सुयश टिळकची ‘अबोली’ मालिकेत होणार एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, फर्स्ट लूक समोर
‘बिग बॉस १७’च्या पहिल्याच भागात अंकिता पतीवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं. विकी घरातील इतर स्पर्धकांसोबत अधिक व्यस्त झाल्याने अंकिता त्याच्यावर नाराज झाली आहे. कालच्या एका प्रोमोवरून असं समोर आलं की, अंकिता ढसाढसा रडत आहे. या प्रोमोमध्ये अंकिता तिचा पती विकी जैनवर नाराज आहे. विकी शोमध्ये प्रत्येक स्पर्धकाला वेळ देत आहे आणि त्यामुळे तो अंकिताला पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत अंकिताला आता बिग बॉसच्या घरात एकट जाणवू लागलं आहे.