बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुयश टिळकची ‘अबोली’ मालिकेत होणार एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, फर्स्ट लूक समोर

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 19, 2023 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suyash Tilak enters in Aboli

सुयश टिळकची 'अबोली' मालिकेत होणार एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, फर्स्ट लूक समोर

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सुयश टिळक. ‘का रे दुरावा’ या मालिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या सुयशने आजवर अनेक मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. विविध कलाकृतींमधून त्याने साकारलेल्या सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहे. गेल्या काही महिन्यांत सुयश विविध मालिकांमध्ये छोटी-मोठी भूमिका साकारताना दिसला आहे. आता तो आणखी एका मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Suyash Tilak enters in Aboli)

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. पोलीस ऑफिसर अंकुश आणि एका साध्या घरातील मुलगी अबोली यांच्याभोवती फिरणाऱ्या मालिकेचे कथानक आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत सचित राजेच्या नावाची बरीच चर्चा होत आहे. आतापर्यंत अंकुशच सचित राजे असल्याचं भासवलं जात होतं. मात्र, सचित राजे हा अंकुश नाही, तर दुसराच असल्याचं समोर येत आहे. मालिकेत आता खऱ्या सचित राजेची एन्ट्री होणार असून अभिनेता सुयश टिळक सचित राजेच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा – “माझं लवकर लग्न होत आहे म्हणून…”, योग्य वयात लग्न होण्याबाबत प्रथमेशने मुग्धाला विचारला प्रश्न, म्हणाली, “ती गोष्ट पटत नाही कारण.. “

सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एका गेटअपमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तो म्हणाला, “नवीन आव्हानात्नक भूमिका”. तर याच भूमिकेतील विविध लूकमधील फोटोजही समोर आले. ज्यात तो स्त्रीवेशासह अन्य लूकमध्ये दिसत आहे. त्याचा हा लुक चाहत्यांसह कलाकार मंडळींना प्रचंड आवडला असून व्हिडिओवर कमेंट करत अभिनेत्याचे कौतुक करत आहे.

हे देखील वाचा – “एक शक्ती आहे जी…”, परफॉर्म, चित्रीकरण करताना श्रेया बुगडेला जाणवते दैवी शक्ती, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “दुर्गादेवीचा चेहरा…”

View this post on Instagram

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

दरम्यान, सचित राजेच्या भूमिका साकारण्यासाठी सुयश खूप उत्सुक असून तो या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाला की, “सचित राजेचं पात्र साकारणं खरच आव्हानात्मक आहे. मालिकेत मी वेगवेगळी रुपं घेणार आहे. कधी स्त्रीवेशात, तर कधी वृद्धाच्या. कधी रिक्षावालाच्या, तर कधी कडकलक्ष्मीच्या रुपात. एरव्ही मला तयार होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. मात्र यामध्ये विविध रुप साकारण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागत आहे. तसेच, मी आजवर ज्या भूमिका साकारल्या आहेत, त्यापेक्षा वेगळी व हटके अशी माझी भूमिका यात आहे.” आता मालिकेत खऱ्या सचित राजेची एन्ट्री होणार असल्याने त्याचा काय मनसुबा असणार आहे, हे येत्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Tags: abolimarathi serialstar pravahsuyash tilakSuyash Tilak enters in Aboli
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
kalyani nandkishor shared life difficult time

"तिच्या हृदयाला छिद्र…", मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लेकीची झाली होती बिकट अवस्था, 'त्या' प्रसंगाबाबत बोलताना म्हणाली, "जास्तीत जास्त सहा महिने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.