सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : राजेशाही एन्ट्री, पार्टी अन्…; शिव ठाकरेने थाटात साजरा केला आजीचा ८१वा वाढदिवस, दिलं खास सरप्राईझ, व्हिडिओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 19, 2023 | 2:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shiv thakare celebrates his Grandmother Birthday

Video : राजेशाही एन्ट्री, पार्टी अन्...; शिव ठाकरेने थाटात साजरा केला आजीचा ८१वा वाढदिवस, दिलं खास सरप्राईझ, व्हिडिओ व्हायरल

आपल्या आजीचं आपल्या आयुष्यात काय महत्व आहे, हे प्रत्येक नातवंडं अगदी मनापासून आणि भरभरुन सांगतो. आजी-आजोबांमुळे प्रत्येकाचं बालपण सुखकर गेलेलं आहे. मग ती सर्वसामान्यांची असो वा कलाकार मंडळींची, आजी ही आजीच असते. जेव्हा आपला नातू मोठं करतो, तेव्हा प्रत्येक आजीचा चेहरा अगदी अभिमानाने फुलून येतो. टीव्ही विश्वातील लोकप्रिय चेहरा शिव ठाकरेही आपल्या आजीचा लाडका आहे. ‘बिग बॉस’च्या दोन्ही सीझनमध्ये तो आपल्या आजीबद्दल भरभरून बोलला आहे. (Shiv thakare celebrates his Grandmother Birthday)

‘बिग बॉस’ रिॲलिटी शोमधून शिव ठाकरे घराघरात पोहोचला आहे. आपल्या साध्या आणि सरळ स्वभावाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. सोशल मीडियावर त्याची मोठी फॅन फॉलोविंग असून त्याच्या अनेक फोटोज व व्हिडीओज नेहमीच चर्चा होत असते. शिवने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला, जो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हे देखील वाचा – “या शोमध्ये आली नसती तर…”, अंकिता लोखंडेने केला बेबी प्लॅनिंगबाबत खुलासा, म्हणाली, “विकीमुळे मी…”

शिवने नुकताच त्याच्या आजीचा ८१वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या आजीसह कारमधून उतरत आहे. यावेळी राजेशाही थाटात त्याच्या आजीचे आगमन होते. पुढे शिवच्या आईसह कुटुंबातील अन्य महिला आजीचे औक्षण करतात. आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबियांच्या उपस्थितीत केक कापला जातो. या व्हिडिओमध्ये कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. आपल्या कुटुंबाने दिलेलं हे सरप्राईझ पाहून शिवची आजी यावेळी भारावून गेली होती. या व्हिडिओला शिवने “आमची आजी, थरथरणाऱ्या हाताची आभाळाएवढी माया. हॅपी बर्थडे माझी आजी” असं सुंदर कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

हे देखील वाचा – प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटामधील विशाख सुभेदारच्या लूकचं होत आहे कौतुक, नेटकरी म्हणाले, “एकदम कडक”

‘रोडीज’ या हिंदी शोमधून घराघरात पोहोचलेल्या शिवने ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता. ज्यात तो विजेताही ठरला होता. त्यानंतर तो ‘हिंदी बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये दिसला होता. या कार्यक्रमामुळे त्याला एक नवी ओळख मिळाली. अनेक रिॲलिटी शोज गाजवल्यानंतर शिव आता ‘झलक दिखला जा’च्या नव्या पर्वात सहभागी होणार आहे.

Tags: bigg boss marathishiv thakareShiv thakare celebrates his Grandmother Birthday
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Sonali Patil On Girls Problem

"चाहत्यांची नजर लागली अन्…", व्हिडीओ शेअर करत 'बिग बॉस' फेम मराठी अभिनेत्रीने सांगितली व्यथा, म्हणाली, "मुलींच हे दुःख…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.