मालिका हा प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत असं म्हणायला हरकत नाही. रोज सायंकाळी प्रेक्षकही मालिका कधी लागणार याची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच काही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात आणि टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकवतात, तर काही मालिका प्रेक्षकांना पसंतीस पडत नाहीत. बरेचदा असेही घडते की या मालिका दीर्घकाळ चालल्याने रटाळ होऊ लागतात. कथानक वाढवून वाढवून या मालिका चालवल्या जातात. कालांतराने या रटाळ मालिका पाहणं प्रेक्षकही बंद करतात. (Star Pravah Serial Going Off Air)
स्टार प्रवाह वाहिनीवरील साऱ्या मालिका विशेषतः प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. स्टार प्रवाह वाहिनीने आणि या वाहिनीवरील मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. असं असलं तरी या वाहिनीवरील एक मालिका दीर्घकाळ चालल्याने आता रटाळ होऊ लागली होती. यांत लवकरच ही रटाळ झालेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी कोरी मालिका रात्री ९.३० वाजता प्रेक्षेपित होणार आहे.
याआधी दररोज रात्री ९.३० वाजता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रक्षेपित होत होती. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वृत्तानुसार, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवट नेमका कसा होणार याबद्दल अद्याप काही समजलेलं नाही. शिवाय मालिका बंद होण्याबाबत वाहिनीकडूनही कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मालिकेत सध्या शालिनी चांगलं वागत असल्याचं नाटक करत आहे. तर गौरी तिच्यापासून संपूर्ण कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता मालिकेच्या शेवटच्या क्षणात गौरी शालिनीला धडा शिकवेल का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अक्षर कोठारी, ईशा केसकर, किशोरी आंबिये हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. चाहत्यांनी या प्रोमोवर लाईक्स व कमेंटचा वर्षाव करायाला सुरुवात केली. तसेच अनेकांनी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका निरोप घेणार असल्याने आनंद झाला असल्याच्या कमेंट केल्या आहेत.