शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘माझ्या नवऱ्याची बायको’नंतर ईशा केसकरची नव्या मराठी मालिकेमध्ये दमदार एन्ट्री, प्रोमो पाहून प्रेक्षक करताहेत कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 14, 2023 | 11:55 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Isha Keskar And Akshar Kothari New Serial

‘माझ्या नवऱ्याची बायको'नंतर ईशा केसकरची नव्या मराठी मालिकेमध्ये दमदार एन्ट्री, प्रोमो पाहून प्रेक्षक करताहेत कौतुक

‘स्टार प्रवाह’ वाहिनी ही प्रेक्षकांची लाडकी वाहिनी आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही वाहिनी अव्वल स्थानावर आहे. आशयघन कथानक असलेल्या या वाहिनीवरील साऱ्या मालिकांनी विशेष लोकप्रियता मिळवली आहे. अशातच या वाहिनीवर आणखी एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर आलं आहे. कालपासून या नव्या मालिकेच्या प्रोमोने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून एक आगळा वेगळा विषय घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे. (Isha Keskar And Akshar Kothari New Serial)

या नव्या मालिकेची जमेची बाजू म्हणजे मालिकेतील कलाकार. अद्याप मालिकेतील सर्वच कलाकारांची नाव समोर आलेली नाहीत. मात्र मालिकेत अभिनेता अक्षय कोठारी, अभिनेत्री किशोरी आंबिये, ईशा केसकर या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. मध्यमवर्गीय घराण्यातील तीन मुली, तर श्रीमंत घराण्यातील तीन मुलं या दोन्ही कुटुंबियांना एकत्र आणणारी ही कथा आहे, असं प्रोमोवरून कळून येत आहे.

आणखी वाचा – “मला नखरे करायला…”, साधेपणाबद्दल विचारताच जुई गडकरीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “सगळे माझी चेष्ठा करतात कारण…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गणेशोत्सवात ईशा केसकर व अक्षर कोठारी सहभागी झाले होते. त्यांना एकत्र पाहून त्यांची नवी मालिका येणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला होता. आता प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला आहे. ही मालिका २० नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रात्री ९. ३० वाजता ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. चाहते देखील मालिकेवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आणखी वाचा – “आधी गाडी नीट चालवा”, मुग्धा व प्रथमेश यांनी ड्राइव्ह करताना गाणं गात बनवला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “चालत्या गाडीमध्ये…”

अभिनेत्री किशोरी आंबिये ‘स्टार प्रवाह’च्या अनेक मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या होत्या. अश्यातच या नव्या मालिकेत त्या तीन मुलींची आई असल्याचं दाखवलं आहे. तर नुकतीच ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतून अक्षयने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यानंतर आता लगेचच तो ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत झळकणार आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेत आणखी कोणते कलाकार पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Tags: akshar kotharientertainmentisha keskarkishori ambiyemarathi actormarathi actressnew serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Star Pravah Serial Going Off Air

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ही' लोकप्रिय मालिका होणार बंद, प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं, "खूप बरं झालं कारण …"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.