Raghav Parineeti Wedding बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आपचे खासदार राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. २४ सप्टेंबरला उदयपूरमध्ये या सोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वीजे दिल्लीतील विधी आटोपून हे दोघं कुटुंबासह काल उदयपूरमध्ये पोहोचले आहे. लग्नाची तयारी आता पूर्ण होत आली आहे. लग्नापूर्वीच्या विधी व समारंभांना मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे. चूडा सेरेमनीपासून शनिवारी लग्नसोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर पाहुण्यांची रेलचेलही सुरु झाली आहे. काहींनी हॉटेलचे फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. (Raghav Parineeti marriage in Udaipur functions start)
आज सकाळी १० वाजल्यापासून समारंभांना सुरुवात होणार आहे. चूडा सेरेमनीला सुरुवात होणार आहे. या सोहळा ज्याठिकाणी आहे ते हॉटेल लीला पॅलेसमधील सर्वात महागडी जागा आहे. ज्याचं भाडं १० लाख रुपये इतकं आहे. परिणीती व राघव त्यांच्या कुटुंबासहीत शुक्रवारी उदयपूरमध्ये पोहोचले. परिणीतीचे कुटुंब हॉटेल लीलामध्ये तर राघवचे कुटुंब ताज लेक पॅलेसमध्ये थांबले आहे. नवऱ्यासाठी खास महाराणा सूट बुक करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनूसार, कालच परिणीतचा मेहंदी सोहळा साजरा झाला. त्यावेळी दोन्ही कुटुंबीय तिथे उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी लीला पॅलेसच्या शीश महलमध्ये जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. शीश महल हॉटेलच्या सर्वोत्तम ठिकाणी स्थित आहे जिथून पिचोळा तलावाचा किनारा व समोर आरवली डोंगर असा सुंदर निसर्गरम्य परिसर दिसतो.

या शाही विवाहाचा थाटही शाही पद्धतीत असणार आहे. लग्नाची मिरवणूक रविवारी घोडीवरून नाही तर बोटमधून निघणार आहे. जी ताज लेक पॅलेसपासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर असलेल्या लीला हॉटेल येथे पोहोचेल. वराच्या मागणीवरून हॉटेल लीला पॅलेससाठी खास विंटेज कारही मागवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याच्या सजावटीसाठी खास दिल्लीहून आणलेल्या फुलांनी सजावट केली जाणार आहे.

आज संध्याकाळी ९०च्या थीमवर लेडीज संगीताचे आयोजन करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, परिणीतीने नवरोबासाठी खास गाणंही तयार केलं आहे. पाहुण्यांचा ड्रेस कोड हा संगीत सोहळ्याच्या थीमनूसार असणार आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर, वरूण धवन हे लग्नाला उपस्थित असणार आहे. पण परिणीती चोप्राची मोठी बहीण प्रियांका चोप्रा व तिची मुलगी मालती यांच्या उपस्थितीत अजूनही सस्पेन्स कायम आहे. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित असणार आहेत.

वर-वधुच्या कुटुंब व मित्रपरीवाराची राहण्याची व्यवस्था ताजमध्ये करण्यात आली आहे. पाहुण्यांसाठी खास डिनर व राजस्थानी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या स्वागतासाठी खास ‘केशरिया बालम’ गाणं वाजवण्यात आलं. तसेच फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली होती.