शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding राघव चड्ढाची लग्नमंडपात होणार ग्रँड एण्ट्री, लाखो रुपयांचा खर्च, लग्नापूर्वीच्या विधींसाठी नटली परिणीती चोप्रा

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 23, 2023 | 11:30 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Raghav Parineeti marriage in Udaipur functions start

Raghav Parineeti marriage in Udaipur functions start

Raghav Parineeti Wedding बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आपचे खासदार राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. २४ सप्टेंबरला उदयपूरमध्ये या सोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वीजे दिल्लीतील विधी आटोपून हे दोघं कुटुंबासह काल उदयपूरमध्ये पोहोचले आहे. लग्नाची तयारी आता पूर्ण होत आली आहे. लग्नापूर्वीच्या विधी व समारंभांना मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे. चूडा सेरेमनीपासून शनिवारी लग्नसोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर पाहुण्यांची रेलचेलही सुरु झाली आहे. काहींनी हॉटेलचे फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.  (Raghav Parineeti marriage in Udaipur functions start)

आज सकाळी १० वाजल्यापासून समारंभांना सुरुवात होणार आहे. चूडा सेरेमनीला सुरुवात होणार आहे. या सोहळा ज्याठिकाणी आहे ते हॉटेल लीला पॅलेसमधील सर्वात महागडी जागा आहे. ज्याचं भाडं १० लाख रुपये इतकं आहे. परिणीती व राघव त्यांच्या कुटुंबासहीत शुक्रवारी उदयपूरमध्ये पोहोचले. परिणीतीचे कुटुंब हॉटेल लीलामध्ये तर राघवचे कुटुंब ताज लेक पॅलेसमध्ये थांबले आहे. नवऱ्यासाठी खास महाराणा सूट बुक करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – ५६व्या वर्षीही एकदम फिट आहे अक्षय कुमार, पाण्यात वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाला, “मला हा व्यायाम…”

सूत्रांच्या माहितीनूसार, कालच परिणीतचा मेहंदी सोहळा साजरा झाला. त्यावेळी दोन्ही कुटुंबीय तिथे उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी लीला पॅलेसच्या शीश महलमध्ये जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. शीश महल हॉटेलच्या सर्वोत्तम ठिकाणी स्थित आहे जिथून पिचोळा तलावाचा किनारा व समोर आरवली डोंगर असा सुंदर निसर्गरम्य परिसर दिसतो.

आणखी वाचा – “कित्येकदा एका नजरेने…”, ‘थ्री इडियट्स’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनानंतर पत्नीची पहिली पोस्ट, म्हणाली, “नेहमीच तू माझा होतास आणि…”

या शाही विवाहाचा थाटही शाही पद्धतीत असणार आहे. लग्नाची मिरवणूक रविवारी घोडीवरून नाही तर बोटमधून निघणार आहे. जी ताज लेक पॅलेसपासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर असलेल्या लीला हॉटेल येथे पोहोचेल. वराच्या मागणीवरून हॉटेल लीला पॅलेससाठी खास विंटेज कारही मागवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याच्या सजावटीसाठी खास दिल्लीहून आणलेल्या फुलांनी सजावट केली जाणार आहे.

आणखी वाचा -“त्यांची लायकीच ती आहे”, तनुश्री दत्ताचं नाना पाटेकरांबाबत पुन्हा एकदा धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, “माझं भांडण…”

आज संध्याकाळी ९०च्या थीमवर लेडीज संगीताचे आयोजन करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, परिणीतीने नवरोबासाठी खास गाणंही तयार केलं आहे. पाहुण्यांचा ड्रेस कोड हा संगीत सोहळ्याच्या थीमनूसार असणार आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर, वरूण धवन हे लग्नाला उपस्थित असणार आहे. पण परिणीती चोप्राची मोठी बहीण प्रियांका चोप्रा व तिची मुलगी मालती यांच्या उपस्थितीत अजूनही सस्पेन्स कायम आहे. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित असणार आहेत.

आणखी वाचा – दोन वर्ष अंथरुणाला खिळले होते मनोज जोशी, सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाले, “कोमात गेलो, दृष्टीही गेली

वर-वधुच्या कुटुंब व मित्रपरीवाराची राहण्याची व्यवस्था ताजमध्ये करण्यात आली आहे. पाहुण्यांसाठी खास डिनर व राजस्थानी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या स्वागतासाठी खास ‘केशरिया बालम’ गाणं वाजवण्यात आलं. तसेच फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली होती.

Tags: Parineeti ChopraRaghav ChadhaRaghav Chadha-Parineeti Chopra weddingRaghav Parineeti weddingTaj Lake PalaceUdaipur
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Prathamesh Laghate making Modak for Ganpati Bappa

Video : प्रथमेश लघाटेने स्वयंपाक घरात बसून बनवले उकडीचे मोदक, सुकन्या मोने म्हणाल्या, "तुझ्यासारखा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.