बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यापैकी एक अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. त्याला आजपर्यंत आपण विविध चित्रपटात विविध स्टंट करताना पाहिलं आहे. अक्षय ५६ वर्षाचा आहे. पण या वयात त्याच्या फिटनेसचा विचार केला तर तो कोणत्याही २० वर्षाच्या खेळाडूशी स्पर्धा करू शकतो. बॉलिवूडमधील फिट अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमारचं नाव नक्कीच अग्रस्थानी असेल. नुकताच त्याने नवीन सुरु झालेल्या व्हॉट्सअॅप चॅनेलमध्ये एक पोस्ट शेअर केली. यात त्याने स्वतःची अनोखी वर्कआऊट रुटीनची झलक शेअर केली. (akshay kumar aqua workout)
अक्षयने एक क्लीप शेअर करताना लिहीले, “शुभ सकाळ मित्रांनो मी नुकतंच माझं एक वर्कआऊट पूर्ण केलं. मला पूर्ण शरीराच्या व्यायामासाठी पाण्यातील हा व्यायाम जास्त आवडतो. ज्यात कोणत्याही दुखापतीच्या समस्येला सामोरे जावं लागत नाही. तसेच पाण्यात स्वतःचा श्वास थांबवून ठेवणं हा खूप चांगला व्यायाम आहे. फुफ्फुसही त्यामुळे दिवसभरातील संघर्षासाठी तयार झाली आहेत. जर तुम्हीही आज व्यायाम केला असेल तर थम्स-अप द्या! चिअर्स!”, असं म्हणत त्याने हा व्हिडिओ शेअर केला.
आणखी वाचा – मुलीचं नाव काय ठेवणार? याबाबत राहुल वैद्यचा खुलासा, म्हणाला, “नावं काढली आहेत पण…”
रिपोर्ट्सनुसार, अक्षय आपल्या दिवसाची सुरुवात एक तास पाण्यात पोहून करतो. त्यानंतर तो मार्शल आर्ट्सचा सराव, योगा व काही स्ट्रेचिंग असे व्यायाम करतो. यापूर्वी त्याने प्रोटीन पावडरवर अनेक विधाने केली होती. त्याची ती मतं चुकीच्या पद्धतीने मांडली गेली होती आणि त्याचा स्टिरॉइड्स, पीईडी यांच्याशी संबंध जोडला गेला होता. मात्र अक्षय ५६ वर्षांचा असूनही त्याला अशाप्रकारे शरीरावर मेहनत घेताना पाहणं कौतुकास्पद आहे.
अक्षय स्वतःच्या खाण्याच्या सवयींबाबत खूप सतर्क आहे. पण तितकेच त्याला विविध खाद्यपदार्थ खाण्याची आवड आहे. अक्षय सध्या ‘मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. या चित्रपटात परिणीती चोप्राही प्रमुश भूमिकेत आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे.