शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन वर्ष अंथरुणाला खिळले होते मनोज जोशी, सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाले, “कोमात गेलो, दृष्टीही गेली अन्…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 21, 2023 | 5:10 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
manoj joshi suffered a stroke

manoj joshi suffered a stroke

टिव्हीसह चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडणारे अभिनेते म्हणजे मनोज जोशी. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. ‘चुप चुप के’, ‘हंगामा’, ‘खट्टा मीठा’, ‘देवदास’ सारख्या चित्रपटांसह त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांत दमदार भूमिका साकारला आहे. अलीकडेच ते आयुष्यमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटात दिसले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोज यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल खुलासा केला. त्यांना आलेल्या स्ट्रोकमुळे सुमारे दीड वर्षे ते अंथरुणाला खिळलेले होते. एवढंच नाही तर त्यांची दृष्टीही गेली होती, असा खुलासा केला. (manoj joshi suffered a stroke)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोज यांनी त्यांच्या आयुष्यातील तो काळ सांगितला जेव्हा ते त्यांच्या बऱ्याच त्रासातून जात होते. संजल लीला भंसाळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी हा प्रकार घडला. यादरम्यान त्यांना स्ट्रोक आला होता. मनोज सांगतात, “२००१ मध्ये मी आजारी पडलो. मला स्ट्रोक आला होता. त्यामुळे पुढिल दीड वर्ष मी रुग्णालयात बेडवरच होतो. ‘देवदास’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मी आजारी पडलो. त्यावेळी मी ४ दिवस कोमात होतो. त्या आजारात माझी दृष्टीही गेली होती. १९ दिवस मला काहीही दिसत नव्हतं. त्यामुळे हा आताचा झालेला माझा पुनर्जन्म आहे. मी रुग्णालयात होतो तोपर्यंत माझा बँक बॅलन्स शून्यावर होता. तेव्हा माझ्या पत्नीला खूप त्रास सहन करावा लागला होता. त्यावेळी ती मला आधार देण्यासाठी शिकवण्याही घेत होती”.

View this post on Instagram

A post shared by Manoj Joshi (@actormanojjoshi)

आणखी वाचा – गुलाबी सुट, हातावर मेहंदी…; परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, फोटो व्हायरल

मनोज पुढे सांगतात, “मला २००३ मध्ये ‘कहता है दिल’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. यात मी खलनायकाची भूमिका साकारली होती. सुरुवातीला मला त्या कार्यक्रमात ४ दिवसाचं काम होतं. पण पुढे माझी भूमिका वाढत गेली. काही दिवसांनी मी त्या मुख्य कलाकारांपैकी एक बनलो. यानंतर पुढे मला ‘हंगामा’, ‘हल चल’ असे अनेक चित्रपट मिळाले. मी चित्रपट निर्माता प्रियदर्शनसहदेखील १२ चित्रपट काम केले”.

View this post on Instagram

A post shared by Manoj Joshi (@actormanojjoshi)

आणखी वाचा – “किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला…” आदिनाथ कोठारेच्या लेकीने दिला बाप्पाला सल्ला, म्हणाली, “…जपा जिवाला”

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली होती. ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेली कचरा सेठ ही भूमिका खूप गाजली होती.  

Tags: bollywoodlife storymanoj joshisenior actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
Swapnil Joshi Son emotional on Ganesh Visarjan

Video : बाप्पाचं विसर्जन करताना स्वप्निल जोशीच्या लेकाला कोसळलं रडू, अभिनेत्याने मुलाला समजावलं पण…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.