चित्रपट, मालिका, नाटक व वेबसीरिज या सर्वच माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. जितेंद्रने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाबरोबरच तो उत्तम कवीदेखील असून तो त्याची कविता त्याच्या चाहत्यांसमोर सादर करतो. त्याचबरोबर तो सोशल मीडियावर सक्रिय असून विविध मुद्दे व घडामोडींवर तो स्पष्टपणे व्यक्त होतो. (Jitendra Joshi Viral Post)
असाच एक किस्सा जितेंद्रने त्याच्या चाहत्यांसमोर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो नेमकं कोणाला उद्देशून बोलला आहे, हे मात्र समोर आलं नाही. पण या पोस्टमधून त्याने नो एन्ट्री मधून येणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फटकारले असल्याचे पाहायला मिळत आहे. जितेंद्रने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यात त्याने हा किस्सा सांगितला आहे.
हे देखील वाचा – १००० कोटींच्या ऑनलाइन पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी अभिनेता गोविंदाची चौकशी होणार, अधिकाऱ्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती.
हा किस्सा सांगताना जितेंद्र जोशी म्हणतो,
“No entry मधून येणाऱ्या तरुणाला मी हटकले. त्यावर तो चल जा चल म्हणाला
मी: का येतो आहेस no entry मधून?
तो: कामावर जायला उशीर झालाय?
मी: सुशिक्षित आहेस ना?
तो: शिवी का देतो?
मी: शिवी नाही मी सुशिक्षित म्हणालो
तो: म्हणजे काय?
मी: म्हणजे तू वागतो आहेस ते
तो: पण तुला काय फरक पडतो?
मी: कारण मी नागरिक आहे?
तो: म्हणजे ? नागरिक म्हणजे?
मी: तू आणि मी
तो: संसदेत जाऊन सांग
मी हसू लागतो त्या कंपनीवर ज्याने याला कामावर ठेवलाय, माझ्या स्वतःवर आणि गाडी काढतो..तो no entry मधून तसाच पुढे जात राहतो.”

हे देखील वाचा – Rio Kapadia Passes Away : ‘दिल चाहता है’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट
जितेंद्रने शेअर केलेली ही पोस्ट जोरदार व्हायरल होत असून यामधून त्याने कोणाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे, हे मात्र समोर आले नाही. काही दिवसांपूर्वीच जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गोदावरी’ चित्रपटाला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त चित्रपटाचे व त्याच्या अभिनयाचे भरभरून कौतुक होत आहे.