गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Rio Kapadia Passes Away : ‘दिल चाहता है’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 14, 2023 | 5:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Chak De India Fame Actor Rio Kapadia Died at 66

रिओ कपाडिया यांचे 66 व्या वर्षी निधन

Actor Rio Kapadia Died at 66 : गेल्या काही दिवसांपासून कलाक्षेत्रामधून काही दुःखद घटना समोर येत आहेत. आता आणखी एका कलाकाराचं निधन झालं असल्याची बातमी समोर आली आहे. ‘दिल चाहता है’ फेम अभिनेता रिओ कपाडियचं निधन झालं आहे. तो ६६ वर्षांचा होता. रिओचं निधन कशामुळे झालं याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पण या घटनेनंतर संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम करणाऱ्या रिओच्या निधनानंतर त्याचे चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत.

रिओ कर्करोगामुळे त्रस्त होता. त्याची या रोगाशी सुरु असलेली झुंज अखेरीस अपयशी ठरली आहे. रिओचा जवळचा मित्र फैजल मलिक यांनी सांगितलं की, “आता आपल्यामध्ये रिओ कपाडिया नाही आहे हे सांगण्यास अत्यंत दुःख होत आहे. आज १२.३० वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी (१५ सप्टेंबर) रिओच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील. रिओच्या कुटुंबियांकडून अंतिम संस्काराबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे”.

आणखी वाचा – ‘या’ दिवशी परिणीती चोप्रा व राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिकाही आली समोर

गोरेगाव येथील स्मशानभूमीमध्ये रिओ यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ५ जूनला रिओची शेवटची पोस्ट आहे. त्याने त्याच्या व्हॅकेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते. कुटुंबियांबरोबर तो युरोप ट्रीपवर गेला होता. तिथे त्याने कुटुंबियांसह बरीच धमाल-मस्तीही केली. विशेष म्हणजे तो त्याच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायचा. रिओच्या निधनानंतर सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला आहे.

आणखी वाचा – ‘द कपिल शर्मा’मध्ये प्रेक्षक म्हणून जाण्यासाठी द्यावे लागतात ५ हजार रुपये, कपिलने सांगितलं सत्य, म्हणाला, “आम्ही प्रेक्षकांकडून…”

दिल चाहता है, चक दे इंडिया, हॅप्पी न्यू इयर सारख्या चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत रिओने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘मेड इन हेवन  २’ वेबसीरिजमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. रिओच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह कलाविश्वातील मंडळी श्रद्धांजली वाहत आहेत.

Tags: bollywood actorbollywood newsentertainmententertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Jitendra Joshi Viral Post

“सुशिक्षित आहेस ना?”, नो एन्ट्रीमधून जाणाऱ्यावर भडकला जितेंद्र जोशी, म्हणाला, “तू वागतो ते…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.