बॉलिवूड अभिनेता गोविंदा ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या ते पडद्यावर दिसत नसले, तरी त्याच्या लोकप्रियतेमध्ये तसभूरही कमी झालेली नाही. आपल्या विनोदी अभिनयामुळे नेहमीच चर्तेत राहिलेला अभिनेता सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता गोविंदा अडचणीत आला असून १००० कोटी रुपयांच्या ऑनलाइन पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी लवकरच त्याची चौकशी होणार आहे. ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Govinda Enquitry In Online Ponzi Scheme)
याप्रकरणी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोलर टेक्नो अलायन्स (STA-Token) या कंपनीने अनेक देशांमध्ये क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन पॉन्झी योजना चालवली होती. या योजनेत अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गोविंदाने या कंपनीचे कथितरित्या प्रमोशन व समर्थन केल्यामुळे याप्रकरणी त्याची चौकशी होणार आहे.
असेही म्हटले जात आहे, की या प्रकरणात तब्बल २ लाखांहून अधिक लोकांची फसवणूक झाली असून रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय लोकांकडून पैसा गोळा केल्याचा आरोप कंपनीवर आहे. मात्र, या प्रकरणात गोविंदाची संशयित किंवा आरोपी म्हणून चौकशी होणार नाही. तर, या कंपनीची जाहिरात केल्यामुळे अभिनेत्याला काही प्रश्न विचारले जाणार आहे, असे या चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा – ‘या’ दिवशी परिणीती चोप्रा व राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिकाही आली समोर
आर्थिक गुन्हे शाखेचे महानिरीक्षक जे.एन. पंकज यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला याबाबत माहिती देताना सांगितले की, “जुलैमध्ये गोव्यात कंपनीच्या भव्य समारंभात सहभागी झालेल्या आणि काही व्हिडिओंमध्ये कंपनीची जाहिरात करणाऱ्या अभिनेता गोविंदाची चौकशी करण्यासाठी आम्ही लवकरच एक टीम मुंबईला पाठवू, ते यात संशयित किंवा आरोपी राहणार नाही. पण, जर आम्हाला तपासात आढळलं की त्याची भूमिका त्यांच्या व्यावसायिक करारानुसार केवळ उत्पादनाच्या जाहिरातीपुरता मर्यादित होती, तर आम्ही त्याला आमच्या खटल्यात साक्षीदार बनवू.”, असे ते यावेळी म्हणाले.
हे देखील वाचा – आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची तारीख व ठिकाण ठरलं, होणाऱ्या मराठमोळ्या जावयासाठी अभिनेत्याची जय्यत तयारी
दरम्यान, या घोटाळ्यातील मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून गोविंदाची चौकशी करण्यासाठी स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेची टीम लवकरच मुंबईला रवाना होणार आहे.