गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध गायक अरमान मलिकने दोन वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी उरकला साखरपुडा, कोण आहे त्याची होणारी पत्नी?

Ankita Shindeby Ankita Shinde
ऑगस्ट 28, 2023 | 1:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Armaan Malik engagement

सुप्रसिद्ध गायक अरमानने मलिकने दोन वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी उरकला साखरपुडा, कोण आहे त्याची होणारी पत्नी?

Armaan Malik Engagement : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरमान मलिकच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. तरुण मंडळींमध्ये तर अरमानची गाणी अधिक लोकप्रिय आहेत. लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या या गायकाने आता त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अरमानने साखरपुडा केला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. युट्युबर व व्लॉगर आशना श्रॉफबरोबर अरमानने साखरपुडा केला. त्याने शेअर केलेल्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.

अरमानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो आशनाला गुडघ्यावर बसून अंगठी घालताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो तिला किस करत आहे. दरम्यान या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्यासारखा आहे. या फोटोंमध्ये आशना वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसत आहे. तर अरमानने ब्लेजर घातला आहे. अरमानने फोटो शेअर करताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते त्याच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

आणखी वाचा – “जो भी होगा, देखा जायेगा,” संतुर जोडी नारकर कपलचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “नारकर साहेब…”

“…आणि आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली” असं अरमानने फोटो शेअर करत म्हटलं आहे. काही वृत्तसंस्थेनुसार, आशना अरमानपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. ती फॅशन व ब्युटी व्लॉग करते. तसेच सोशल मीडिया सेलिब्रिटी अशी आशनाची ओळख आहे. लंडनमध्ये आशनाने तिचं फॅशन क्षेत्राशी संबंधित शिक्षण पूर्ण केलं. याआधी फोटोग्राफर सिद्धांतबरोबर तिचं नाव जोडण्यात आलं होतं.

आणखी वाचा – “दोघांचा प्रेमविवाह होता पण…”, आई-वडिलांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा, म्हणाला, “दुर्देवाने फक्त तिनेच…”

View this post on Instagram

A post shared by ARMAAN MALIK ???? (@armaanmalik)

आशना व अरमानच्या फोटोंना नेटकऱ्यांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी मंडळींनी अरमानच्या फोटोंना पसंती दर्शवली आहे. अरमानने आजवर ‘जहर’, ‘बोल दो न जरा’, ‘पहला प्यार’ सारखी सुपरहिट गाणी गात प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. वयाच्या चौथ्या वर्षीच त्याने ‘सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

Tags: bollywood newsentertainment newssingers
Ankita Shinde

Ankita Shinde

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

११ वर्ष डेट, वडिलांचा मृत्यू आणि कॅन्सरशी लढा; प्रत्येक अडथळ्यांमध्ये हिना खानला मिळाली पतीची साथ, सात फेरे घेत अडकले लग्नबंधनात

जून 5, 2025 | 11:00 am
Hina Khan Wedding
Entertainment

कॅन्सरशी झुंज तरीही हिना खानचा लग्न करण्याचा निर्णय, रॉकीसह गुपचूप केला विवाह, साडीवर ८ अंक कोरला कारण…

जून 5, 2025 | 10:37 am
Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Next Post
Kishor Kadam Facebook Post

"लोकांना अजून किती लुटणार?", मुंबई-पुणे हायवेवर दुप्पट टोल घेतल्याप्रकरणी सौमित्र यांचा संताप, म्हणाले, "लोक काहीच बोलत नाहीत म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.