ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. रवींद्र महाजनी यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर महाजनीला बरंच ट्रोल करण्यात आलं. शिवाय त्याच्या आईबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. शेवटच्या क्षणांमध्ये गश्मीर व त्याची आई रवींद्र महाजनी यांच्याबरोबर नव्हती यावरुनही त्यांना ट्रोल करण्यात आलं. पण काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीरने अनेक प्रश्नांची थेट उत्तरं दिली. गेली कित्येक वर्ष रवींद्र त्यांच्या कुटुंबियांबरोबर राहत नसल्याचंही गश्मीरने म्हटलं. आता त्याने आणखी एका विषयाबाबत भाष्य केलं आहे. याचीच आता सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
गश्मीर वडिलांच्या निधनानंतर काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहिला. मात्र आता तो इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. आताही त्याने इन्स्टाग्रामद्वारे ‘ask gash’ असं एक सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले. दरम्यान एका चाहत्याने गश्मीरला त्याच्या आई-वडिलांच्या नात्याबाबत विचारलं. “सर तुमच्या आई-वडिलांचं अरेंज मॅरेज झालं की लव्ह मॅरेज? हा प्रश्न विचारत आहे कारण मधू मॅमसारख्या व्यक्ती रवींद्र सरांच्या आयुष्यामध्ये कशा आल्या हे जाणून घ्यायला मला आवडेल”. असा प्रश्न गश्मीरला विचारण्यात आला.
आणखी वाचा – “तो माझा बाप आहे रे,अपघातानंतर…”संजय मोने यांना घट्ट मिठी मारून जितेंद्र जोशी भावुक
यावेळी गश्मीरने विलंब न लावता उत्तर दिलं. पण त्याने दिलेल्या उत्तराने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. तो म्हणाला, “त्यांचं लव्ह मॅरेज होतं. पण दुर्देव असं की, मनापासून प्रेम फक्त तिनेच (आई) केलं”. गश्मीरच्या या उत्तरामध्येच सगळं काही दडलं असल्याचं समोर आलं. रवींद्र यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीचं त्यांच्यावर अधिक प्रेम होतं हे गश्मीरच्या बोलण्यामधून दिसून आलं.

गश्मीरने वडिलांबाबत काही खुलासे केले होते. त्यांना एकटंच राहायला आवडतं. शिवाय ते मुडी होते असंही त्याने म्हटलं होतं. कित्येक वर्ष रवींद्र महाजनी पुण्यात एकटे राहत होते. तर गश्मीर त्याच्या पत्नी, आई, मुलांसह मुंबईमध्ये राहत आहे. वडिलांच्या निधनानंतर सतत ट्रोलिंग गश्मीर कंटाळला. यानंतरच त्याने काही प्रश्नांची उत्तर देत वडिलांचं सत्य सगळ्यांसमोर आणलं.