सिनेसृष्टी काम करत असणारी बरीच मंडळी आहेत जी कामानिमित्त मुंबई पुणे दौरा करताना दिसतात. दरम्यान बऱ्याच कलाकारांना प्रवासादरम्यान आलेले चांगले वाईट अनुभव ते सोशल मीडियावर शेअर देखील करतात. अशातच काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीने सोशल मीडियावरून शेअर केलेली मुंबई पुण्यादरम्यानची एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. टोल प्रकरणावरून काही दिवसांपासून अभिनेत्री ऋजुता देशमुख चर्चेत आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करताना आलेला अनुभव ऋजुताने सोशल मीडियावरून शेअर केला होता. या प्रवासादरम्यान तिने सोशल मीडियावरून नाराजी व संताप देखील व्यक्त केला होता. (Kishor Kadam Facebook Post)
त्यानंतर आता लोकप्रिय अभिनेते आणि कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. किशोर कदम यांनी संताप व्यक्त करत एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे, यांत त्यांनी म्हटलं आहे की, “मुंबईहून पुण्याला जाताना एक्स्प्रेस हायवे वर २४० टोल घेतात. मध्ये मनःशांती वगैरेमध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा २४० का घेतात? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का?”
आणखी वाचा – बाजारात चक्क लसूण विकायला बसला ‘हा’ सुप्रसिद्ध अभिनेता, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
“एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तास दोन तासांनी येत राहतात. ते पैसे कुठे आणि का जातात? अरे लूट थांबवा रे ही. लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात? कुणाकडे तक्रार करायची? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत?”
किशोर कदम यांच्या या संतप्त फेसबुक पोस्टवर अनेकांनी कमेंट करत याबाबत मत नोंदवले आहे. कमेंटमध्ये अनेकांनी सारखाच अनुभव आल्याबद्दल सांगितलं आहे. तर अनेकांनी तक्रार करुनही काहीच फायदा न झाल्याचंही कमेंट करत म्हटलं आहे.