शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅन्सरशी झुंज तरीही हिना खानचा लग्न करण्याचा निर्णय, रॉकीसह गुपचूप केला विवाह, साडीवर ८ अंक कोरला कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 5, 2025 | 10:37 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hina Khan Wedding

कॅन्सरशी झुंज तरीही हिना खानचा लग्न करण्याचा निर्णय, रॉकीसह गुपचूप केला विवाह, साडीवर ८ अंक कोरला कारण...

प्रेमाची व्याख्या नक्की काय? हे शब्दांत मांडणं अगदी कठीण. पण प्रेम नक्की दिसतं कसं? हे हिना खान व तिचा जोडीदार रॉकी जैस्वालला पाहिल्यानंतर लक्षात येतं. यामागचं कारणही तितकंच खास आहे. हिना व रॉकीने नुकतंच लग्न करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. हिनाने तिच्या बॉयफ्रेंडसह लग्न केलं तर त्यात विशेष काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला असेल. मात्र यामध्ये खूप काही दडलेलं आहे. हिना गेल्या काही काळापासून कॅन्सरशी दोन हात करत आहे. तिला तिसऱ्या टप्प्यातील स्तनाचा कॅन्सर झाला असल्याचं समोर आलं. अशा परिस्थितीत रॉकीने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला हे विशेष. जोडीदार कठीण परिस्थितीत असताना, कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत असताना लग्न करणं म्हणजे रॉकीने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. (Hina Khan Wedding)

हिना व रॉकीने बुधवारी (४ जून) रात्री सोशल मीडिया अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत लग्नाची गोड बातमी दिली. अगदी साध्या पद्धतीने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हिना व रॉकीने लग्नगाठ बांधली. लग्नाचे फोटो समोर येताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. याआधी दोघांनीही लग्नाबाबत कोणतीच माहिती दिली नव्हती. हिना व रॉकीने अचानक लग्न करण्याचा निर्णय नक्की का घेतला? हे काही दिवसांमध्ये समोर येईलच. पण कठीण काळामध्ये एकमेकांना मिळणारी साथ खरंच मोलाची ठरली आहे.

आणखी वाचा – “इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

View this post on Instagram

A post shared by ???????????????? ???????????????? (@realhinakhan)

हिनाने लग्नासाठी ओपल हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या साडीची तिने निवड केली. सोनेरी आणि चंदेरी धाग्यांनी या साडीचं डिझाइन करण्यात आलं होतं. साडीची किनार हलक्या गुलाबी रंगाने सजवली होती. ब्लाऊजही अगदी हलक्या गुलाबी रंगाचा होता. त्यावर सुंदर वर्क करण्यात आलं होतं. त्यामुळे हिनाचा लूक आणखीनच उठून दिसत होता. तर साडीवर ८ अंक लिहिलण्यात आला होता. याचा अर्थ इनफिनिटी. इनफिनिटीचं हे साइन होतं. आयुष्यभर अशीच एकमेकांची साथ देऊया सांगणारी ही डिझाइन होती.

आणखी वाचा – दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

तसेच हिनाने साडीवर परिधान केलेली गुलाबी रंगाची शाल अधिक लक्षवेधी ठरत होती. हिनाने साडीवर परिधान केलेल दागिने, हातावरील मेहंदी अधिक आकर्षक होती. तर रॉकीने मनिष मल्होत्रानेच डिझाइन केलेला त्याचा सिग्नेचर कुर्ता परिधान केला होता. ज्याच्यावर अगदी सुंदर वर्क करण्यात आलं होतं. त्यावर मॅचिंग स्टॉल रॉकीने घेतलं होतं. हिना व रॉकीची जोडी अगदी परफेक्ट दिसत होती. गेल्या ११ वर्षांपासून हिना व रॉकी एकमेकांना डेट करत आहेत. हिनाच्या वडिलांचं निधन झालं तेव्हाही तो तिच्याबरोबर हिंमतीने उभा होता. आता आजारपणातही हिनाची तो वेळोवेळी सेवा करत आहे.

Tags: bollywood newsentertainment newshina khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Hina Khan Wedding

११ वर्ष डेट, वडिलांचा मृत्यू आणि कॅन्सरशी लढा; प्रत्येक अडथळ्यांमध्ये हिना खानला मिळाली पतीची साथ, अखेर अडकले लग्नबंधनात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.