शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

परिणीती चोप्रा व राघव चड्ढाच्या लग्नाची जोरदार तयारी, तारीख व ठिकाणही ठरलं, कुठे पार पडणार शाही विवाहसोहळा?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 21, 2023 | 4:44 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Parineeti And Raghav Wedding Date Announced

Parineeti And Raghav Wedding Date Announced

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. याच वर्षी हे दोघं विवाहबंधनात अडणार असल्याची माहिती समोर आली. बऱ्याच काळापासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र परिणीतीने सुरुवातीला आपल्या नात्याबाबत मौन बाळगणं पसंत केलं. दरम्यान १३ मे २०२३ मध्ये दिल्लीत साखरपुडा करत आपलं नातं अधिकृतरित्या जगासमोर आणलं होतं. आता नुकतीच त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. २५ सप्टेंबरला हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.(Parineeti And Raghav Wedding Date Announced)

परिणीती व राघव यांचं लग्न थाटामाटात पार पडणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नाच्या तयारीसाठी परिणीतीने स्पेशल टिमदेखील सज्ज केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या लग्नाची तयारी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. लग्न सोहळ्यासाठी राजस्थान हे ठिकाण ठरलं असून त्यानंतर गुरुग्राममध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत परिणीतीला विचारलं असता तिच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही.

वाचा – कुठे पार पडणार शाही विवाहसोहळा?(Parineeti And Raghav Wedding Date Announced)

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

Video : …अन् रेल्वेस्थानकार डान्स करत राहिल्या ‘बाईपण भारी देवा’मधल्या अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

राघव व परिणीती एकमेकांना १५ वर्षांपूर्वीपासून ओळखतात. परिणीती यापूर्वी युकेमध्ये मँचेस्टर विद्यापीठात व्यवसाय, अर्थशास्त्र आणि वित्त विषयात पदवी अभ्यासक्रम शिकत होती तर राघव त्याचवेळी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिकत होते तेव्हा दोघांची ओळख झाली. पण दोघांच्या प्रेमकथेची सुरुवात गेल्यावर्षी झाली. यावेळी ती पंजाबमध्ये ‘चमकिला’ चित्रपटाचं चित्रीकरणात व्यस्त होती. राघव तिला भेटण्यासाठी चित्रीकरणाच्या सेटवर गेला होता. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता लवकरच दोघं लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

आणखी वाचा – खुशबू तावडेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार, म्हणाली, “मी मुळची कोकणातली म्हणून…”

परिणीती सध्या ‘द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यात ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: bollywood actressbollywood newscelebrationlove story
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mahi Shared Video With Daughter Tara

मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी रुग्णालयात दाखल, 'या' आजाराशी करतेय सामना

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.