शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी रुग्णालयात दाखल, ‘या’ आजाराशी करतेय सामना

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 21, 2023 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Mahi Shared Video With Daughter Tara

Mahi Shared Video With Daughter Tara

अभिनेता जय भानुशाली व अभिनेत्री माही भानुशाली हे कपल नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. विशेषतः त्यांची मुलगी तारा ही चाहत्यांची फेवरेट आहे. ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तिच्या क्युटनेसचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सध्या ताराचा एक व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. ती सध्या रुग्णालयात उपचार घेत असून माहीने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Mahi Shared Video With Daughter Tara)

माहीने शेअर केलेल्या व्हिडिओत ती ताराचे केस बांधताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने म्हटलं , “मुलांना आलेला ताप पालकांना त्रास देतो, कधीकधी तो त्यांना घाबरवतोही. जेव्ही गुरुवारी रात्री ताराला खूप ताप आला तेव्हा हा अनुभव मलाही आला. स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीनंतर तारा गुरुवारी शाळेत गेली. बहुतेक वेळा ताप इतका गंभीर नसतो पण यावेळी आलेला ताप हा आमच्या तारासाठी खूप गंभीर होता”.

वाचा – व्हिडिओतून माही काय म्हणाली?(Mahi Shared Video With Daughter Tara)

View this post on Instagram

A post shared by Mahhi Vinod Vij (@mahhivij)

आणखी वाचा – Video : …अन् रेल्वेस्थानकार डान्स करत राहिल्या ‘बाईपण भारी देवा’मधल्या अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

माहीने पुढे लिहीलं की, “आम्ही डॉक्टरांशी चर्चा करून तिला औषध दिलं पण तरीही तिचा ताप उतरला नाही. औषध देऊनही ताप १०४पेक्षा अधिकच होता. ताप उतरत नसल्यामुळे आम्ही थंड पाण्याच्या पट्ट्याही ठेवल्या. तरीही ती तापामुळे कापत होती. मी पुन्हा रात्री १ वाजता डॉक्टरांना कॉल केला. पण आजकाल सगळ्याच मुलांना व्हायरल इन्फेक्शन होत असल्यामुळे डॉक्टरांनी मला काळजी न करण्यास सांगितलं. पण आईचं मन असल्यामुळे काळजीपोटी रात्रभर मला झोप लागली नाही”.

View this post on Instagram

A post shared by Mahhi Vinod Vij (@mahhivij)

आणखी वाचा – परिणीती चोप्रा व राघव चड्ढाच्या लग्नाची जोरदार तयारी, तारीख व ठिकाणही ठरलं, कुठे पार पडणार शाही विवाहसोहळा?

माही पुढे म्हणाली, “शुक्रवारी ताराला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तिच्यावर चाचण्या केल्या आणि तिला इन्फ्लूएंझा ए फ्लूची लागण झाल्याचं कळलं. या तापाला हलक्यात घेऊ नका आणि मुलांची चांगली काळजी घ्या. या काळात मुलांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे”. असा सल्ला देत तिने ताराच्या प्रकृतीतही सुधारणा असल्याचं चाहत्यांना कळवलं. तिला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचही तिने सांगितलं.

Tags: bollywood actorbollywood actresslife storysocial mediavideo viral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
Next Post
Sharmishtha Raut On Husband

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने नवऱ्याला लग्नापूर्वी घातली 'ती' अट, खुलासा करत म्हणाली, "तो माझ्यासाठी गिरगावचं घर सोडून आला आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.