गुरूवार, जून 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : स्वतः स्पीड बोट चालवत मित्राच्या भेटीला निघाले धर्मेंद्र, ८९व्या वर्षीही असलेला उत्साह पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 10, 2025 | 12:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
dharmendra speed boat video

Video : स्वतः स्पीड बोट चालवत मित्राच्या भेटीला निघाले धर्मेंद्र, ८९व्या वर्षीही असलेला उत्साह पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक

अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहायचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं हेच प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. वय झाल्यानंतरही थोडं का होईना पण कलेशी निगडीत राहायला कलाकारांना आवडतं. पण बऱ्याचदा कलाकार एक वेगळीच तक्रार करताना दिसतात. वयोवृद्ध कलाकारांना फारसं लक्षात ठेवलं जात नाही असा नाराजीचा सूर कुठेतरी दिसतो. काही अंशी पाहता ते बरोबरही आहे असं वाटतं. मात्र सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र याला अपवाद आहेत. वयाच्या ८९व्या वर्षीही ते तितकेच फिट आहेत. सध्या धर्मेंद्र इंडस्ट्रीमध्ये कार्यरत नसले तरी विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. (dharmendra speed boat video)

धर्मेंद्र आता वयाची नव्वदी गाठतील. मात्र नवनवीन गोष्टी करण्यासाठी ते तितकेच उत्साही असतात. मध्यंतरी त्यांचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. आताही धर्मेंद्र यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये ते स्पीड बोट चालवताना दिसत आहेत. बोट चालवतानाचा त्यांचा उत्साह आणि चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा आहे.

आणखी वाचा – “तुमचंही वय होईल, तुम्हालाही मरण…”, मरण, वयावरुन डिवचणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांचं उत्तर, हटके रिप्लाय

View this post on Instagram

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

इतकंच काय तर बोट चालवत ते गाणं गात आहेत. ‘आज मौसम बडा बेइमान है’ गाणं धर्मेंद्र गात आहेत. धर्मेंद्र यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “एक उत्तम माणूस बिक्रमला भेटण्यासाठी मी त्याच्याच बोटीमधून जात आहे. एकदम थ्रीलिंग आणि आनंद देणारा हा प्रवास आहे”. धर्मेंद्र यांच्या या व्हिडीओला काही तासांमध्येच हजारो व्ह्युज व लाइक्स मिळाले आहेत. तसेच कमेंट करत नेटकऱ्यांनी कौतुक केलं.

आणखी वाचा – शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली दीपिका कक्कर, लेकाची भेट होताच झाली खुश, अभिनेत्रीची तब्येत आता कशी?

तुम्ही असंच एन्जॉय करा खूप छान वाटतं, तुम्हाला आणखी आयुष्य लाभो, तुम्ही नेहमीच खूश राहा आणि असेच कायम हसत राहा, तुमच्या दिर्घायुष्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत, तुम्ही ९० चे नाहीत तर १९ वर्षाचे वाटता. अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ते शायरी करताना दिसत होते. त्यांच्या या व्हिडीओलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. इन्स्टाग्रामवर त्यांचे २ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

Tags: bollywood newsdharmendraentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Ankita Walavalkar trauma
Entertainment

“तेव्हा कोणीतरी अतिप्रसंग करतं आणि…”, भांडी घासण्याच्या ट्रॉमावरुन अंकिता वालावलकरचं स्पष्टीकरण, म्हणाली, “थट्टा केली पण…”

जून 12, 2025 | 6:30 pm
All Is Well Marathi Movie
Entertainment

ऑल इज वेल! अमर, अकबर आणि अँथनी येत आहेत लवकरच, चित्रपटात दिसणार मराठीतील तीन लोकप्रिय चेहरे

जून 12, 2025 | 6:00 pm
Is Egg Veg Or Non Veg
Entertainment

अंडी मांसाहारी आहेत की शाकाहारी?, अखेर शास्त्रज्ञांकडून सत्य आले समोर, अंडी खाण्याचे फायदेही सांगितले…

जून 12, 2025 | 5:30 pm
Renuka Shahane Motherhood Experience
Entertainment

“जर मुलगी झाली असती तर…”, डिलिव्हरीनंतर रेणुका शहाणेला नातेवाईकांकडून वाईट अनुभव, म्हणाली, “वजन कमी करायला…”

जून 12, 2025 | 4:30 pm
Next Post
lakhat ek amcha dada actor engagement

‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्याचा साधेपणात साखरपुडा, होणाऱ्या बायकोसह व्हिडीओ शेअर करत दिलं सरप्राइज, Video व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.