मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जर मुलगी झाली असती तर…”, डिलिव्हरीनंतर रेणुका शहाणेला नातेवाईकांकडून वाईट अनुभव, म्हणाली, “वजन कमी करायला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 12, 2025 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Renuka Shahane Motherhood Experience

"जर मुलगी झाली असती तर…", डिलिव्हरीनंतर रेणुका शहाणेला नातेवाईकांकडून वाईट अनुभव, म्हणाली, "वजन कमी करायला…"

Renuka Shahane Motherhood Experience : आजही अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांना वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असतो. अलीकडे हे चित्र बदलताना दिसत असलं तरी काही घरांमध्ये हे चित्र पाहायला मिळत. पहिला मुलगाच व्हायला हवा, दोन मुली झाल्या आता मुलगाच हवा असा अट्टाहास अनेकांच्या घरी केला जातो, आणि हो याला दोष मात्र त्या स्त्रीलाच दिला जातो. हा हे केवळ सर्वसामान्यांच्या घरीच नाही तर कलाकारांच्याही घरी झालं आहे. हो. सुशिक्षित, सुधारलेल्या घरातही असे किस्से घडलेले कानावर येतात. असाच एक किस्सा घडला आहे ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याबरोबर. पहिल्यांदाच रेणुका या गरोदर राहिल्या तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून असाच काही अनुभव आला.

अभिनेत्री गौहर खानने नुकतेच तिचे यूट्यूब पॉडकास्ट ‘माँ नोरंजन’ लाँच केले आहे. या पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये गौहर खानने ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे यांना आमंत्रित केले होते. या एपिसोडमध्ये रेणुका शहाणे यांनी आई होण्याच्या त्यांच्या प्रवासाबद्दल आणि समाजातील विचित्र दबावांबद्दल मोकळेपणाने सांगितले. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी आशुतोष राणा यांच्याशी लग्न केलं. आधीच उशिरा लग्न झालं असल्याने त्यांनी लगेचच बाळाचा विचार केला आणि त्या वयाच्या ३६ व्या वर्षी त्या गरोदर राहिल्या.

आणखी वाचा – लग्नाच्या एका आठवड्यानंतर हिना खानने गाठलं रुग्णालय, हनिमूनदरम्यानच बिघडली तब्येत, म्हणाली, “खूप दुखतंय…”

गरोदरपणातील हा अनुभव शेअर करत त्या म्हणाल्या, “मी २००२ मध्ये माझ्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी, माझ्या पतीची मैत्रीण असलेली एक डॉक्टर रुग्णालयात आली आणि मला म्हणाली, “आता तुला वजन कमी करावे लागेल”. मला समजले नाही की हा कसला दबाव आहे? मला पूर्णपणे धक्का बसला होता. एका आईवर मुलाला जन्म दिल्यानंतर लगेचच पूर्वीसारखे दिसण्याचा दबाव असतो, जणू काही काहीही झालेच नाही. फक्त एक चांगली व्यक्ती किंवा चांगली आई असणे पुरेसे नाही, तर परिपूर्ण दिसण्याचा दबावसुद्धा तिच्यावर असतो”.

आणखी वाचा – “घटस्फोट घेतला आणि दोन महिन्यात तो गेला”, ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री नवऱ्याच्या आठवणीत भावुक, म्हणाली, “नशेच्या आहारी…”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी ३६ वर्षांची असताना पहिल्यांदा आई झाले. मुलं छान सुदृढ असल्यामुळे मी खुश होते. पण तेव्हाच कुटुंबातलं कोणतरी आमच्याकडे आलेलं आणि म्हणालं थॅंक गॉड तुला मुलगाच झाला. त्यांचं ते बोलण ऐकून मला वाईट वाटलं. आई झाल्याने मी खूश होते पण जर मुलगी झाली असती तर ते मला असं म्हणाले असते का? असा विचारचं कसा येऊ शकतो लोकांच्या मनात हा प्रश्न मला पडला. त्यांचे ते बोलणे माझ्या मनाला खूप लागले”.

Tags: healthMotherhood Experiencerenuka shahane
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Is Egg Veg Or Non Veg

अंडी मांसाहारी आहेत की शाकाहारी?, अखेर शास्त्रज्ञांकडून सत्य आले समोर, अंडी खाण्याचे फायदेही सांगितले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.