सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्याचा साधेपणात साखरपुडा, होणाऱ्या बायकोसह व्हिडीओ शेअर करत दिलं सरप्राइज, Video व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 10, 2025 | 12:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
lakhat ek amcha dada actor engagement

‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्याचा साधेपणात साखरपुडा, होणाऱ्या बायकोसह व्हिडीओ शेअर करत दिलं सरप्राइज, Video व्हायरल

टेलिव्हीजन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी माध्यम आहे. याची प्रचिती आणि अनुभव अनेक कलाकारांना आला. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता शुभम पाटील. झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेमुळे शुभम आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात आला. तो या मालिकेमध्ये साकारत असलेलं दत्तात्रय (दत्तू) हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. आता शुभमने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने सगळ्यात सुंदर व्हिडीओ शेअर करत सगळ्यांना एक सुखद धक्काच दिला. त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. (lakhat ek amcha dada actor engagement)

शुभमचा थाटामाटात साखरपुडा झाला आहे. त्याने होणाऱ्या बायकोसह व्हिडीओ पोस्ट करत याबाबत सांगितलं. “भविष्यात लवकर आम्हीच मिस्टर आणि मिसेस पाटील होऊ” असं शुभमने व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं. त्याने व्हिडीओ पोस्ट करताना कपल, आयलव्हयु, साखरपुडा, लव्हलाइफ असे बरेच हॅशटॅग्स दिले आहेत. त्यावरुनच शुभमने त्याचा जोडीदार निवडला आणि लवकरच तो लग्नबंधनातही अडकणार असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – “‘बिग बॉस’मध्ये जाणार हे मला सांगितलं नाही”, उषा नाडकर्णींच्या मुलाचा खुलासा, म्हणाला, “आईने एकदा ठरवलं की…”

View this post on Instagram

A post shared by Shubham Patil (@shubhampatil_96)

या व्हिडीओमध्ये शुभम व त्याची होणारी पत्नी फारच सुंदर दिसत आहे. शुभमने पांढऱ्या रंगाचा कुर्ता व पायजमा परिधान केला आहे. त्यावर त्याने नारंगी रंगाचा शेला घेतला आहे. तर त्याची पत्नी हिरव्या साडीमध्ये अगदी उठून दिसत आहे. तिने हिरव्या साडीवर परिधान केलेला डिझायनर ब्लाउज विशेष लक्ष वेधून घेत आहे. शुभमच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा – “तुमचंही वय होईल, तुम्हालाही मरण…”, मरण, वयावरुन डिवचणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांचं उत्तर, हटके रिप्लाय

खूप खूप अभिनंद, खूप मस्त जोडी, सुंदर बातमी दिली, मिस्टर आणि मिसेस पाटील अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काही कलाकारांनीही शुभमला शुभेच्छा दिल्या. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील शुभमची भूमिका विशेष गाजत आहे. याआधीही त्याने झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ मालिकेत काम केलं होतं.

Tags: entertainment newsmarathi actormarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Kranti Redkar On Mahesh Manjrekar

"महेश मांजरेकरांनी माझं पात्रच सिनेमातून काढलं", क्रांती रेडकरने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली, " त्याचं दु:ख…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.