मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तेव्हा कोणीतरी अतिप्रसंग करतं आणि…”, भांडी घासण्याच्या ट्रॉमावरुन अंकिता वालावलकरचं स्पष्टीकरण, म्हणाली, “थट्टा केली पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 12, 2025 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ankita Walavalkar trauma

“तेव्हा कोणीतरी अतिप्रसंग करतं आणि...”, भांडी घासण्याच्या ट्रॉमावरुन अंकिता वालावलकरचं स्पष्टीकरण, म्हणाली, “थट्टा केली पण...”

सामाजिक मुद्द्यांवर आपलं मत मांडत मुद्द्यांनुसार बोलणारी कलाक्षेत्रातील व्यक्ती म्हणजे कोकणहार्टेट गर्ल अंकिता वालावलकर. अंकिताने स्वबळावर कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाल्यानंतर तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या शोमध्ये काही वेळा तिला ट्रोलही करण्यात आलं. यापैकी अंकिताचा एक मुद्दा प्रचंड गाजला. अंकिताला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे असं तिने म्हटलं होतं. यावर तिला बरंच ट्रोलही करण्यात आलं. बरेच मीम्स, व्हिडीओ यावर बनवण्यात आले. याचबाबात तिने आता भाष्य केलं आहे. (Ankita Walavalkar trauma)

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणावर भाष्य करणारा एक व्हिडीओ अंकिताने शेअर केला. तसेच मुलींबरोबर घडणाऱ्या घटनांविषयी तिने यावेळी भाष्य केलं. अंकिताने तिला भांडी घासण्याचा ट्रॉमा का आहे? याविषयी सांगितलं. अंकिता म्हणाली, “भांडी घासण्याचा ट्रॉमा याच्यावर बाहेर खूप हसलं गेलं. हे तुम्हाला आठवतंय का?. बाहेर त्याच्यावरती बरेच व्हिडीओ बनवले गेले. इन्फ्ल्युएन्सरसाठी तर तो एक कटेंट होता. इतर लोकांसाठीही तो कटेंटच होता. अजूनही त्याच्यावरती कमेंट्स येतात. मध्ये मध्ये मला त्या कमेंट दिसतात”.

आणखी वाचा – “‘बिग बॉस’ला माझं मानधन परवडलं नाही म्हणून…”, नवज्योत सिंह सिद्धू यांचं वक्तव्य, चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी…

“मी एकदम साध्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगते. एखाद्या मुलीला बाहुलीचा ट्रॉमा असतो. बाहुली बघितली की, तिला भीती वाटते. ट्रॉमा शब्दाचा अर्थ तुम्ही तेवढा खोलवर जाऊन ऐकाच. माझ्या ओळखीतल्या एका मुलीला तर फुगा बघितला तर भीती वाटते. असं का? तर तिच्या हातात कोणीतरी फुगा दिलेला असतो आणि तिच्यावर अतिप्रसंग झालेला असतो. फुगा बघितल्यावर पटकन ते तिला आठवतं की, अरे माझ्याबरोबर हे असं झालं होतं. त्या गोष्टी आठवल्याने त्रास होतो आणि अगदी विचित्र वाटतं”.

आणखी वाचा – Video : अनेक जखमी, लाखोंचं नुकसान अन्…; राम चरणच्या चित्रपटाच्या सेटवर पूर परिस्थिती, भयावह व्हिडीओ समोर

“भांडी घासण्याबाबत मी त्या रिएलिटी शोमध्ये जेवढं काही बोलले त्याविषयी मस्त एडिट केलं गेलं. मी जे केलं त्याची मी माफी मागू शकते पण का केलं? हे सिद्धही करते. पण त्या शोमध्ये मी त्यानंतर जे काही बोलले ते एडिट केलं गेलं. हा आहे आपला समाज. बोलताना ती गोष्ट खूप सहज वाटते पण त्यामागे काहीतरी कारण असतं. मला सांगा बंद बाथरुममध्ये तुम्ही कपडे धुत आहात. अचानक कोणीतरी आलं आणि तुमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यभर तुम्हाला तिच गोष्ट आठवणार”. अंकिताने अगदी सुंदर शब्दांमध्ये तिचं मत मांडलं.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
 Karisma Kapoor Ex Husband  Death

करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचे निधन, वयाच्या ५३व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पोलो खेळताना... 

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.