मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऑल इज वेल! अमर, अकबर आणि अँथनी येत आहेत लवकरच, चित्रपटात दिसणार मराठीतील तीन लोकप्रिय चेहरे

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 12, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
All Is Well Marathi Movie

ऑल इज वेल! अमर, अकबर आणि अँथनी येत आहेत लवकरच, चित्रपटात दिसणार मराठीतील तीन लोकप्रिय चेहरे

All Is Well Marathi Movie : ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता मात्र ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ असं म्हणत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांच्या दोस्तीची दुनियादारी पहायला मिळणार आहे. ‘वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स’ या चित्रपट निर्मिती संस्थेच्या आगामी ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटात अमर, अकबर आणि अँथनी नावाच्या तीन मित्रांच्या मैत्रीची धमाल गोष्ट पहायला मिळणार आहे. मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे.

या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर हे जबरदस्त त्रिकुट ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले असून तिघांसह या चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

आणखी वाचा – CID मधून डॉक्टर साळुंखेंची एक्झिट?, नरेंद्र गुप्तांना शोमधून काढण्यावरुन प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “आम्हाला मान्य नाही”

पोटापाण्याच्या शोधात मुंबईत आलेल्या अमर, अकबर आणि अँथनी या तिघांच्या आयुष्यात एका अनपेक्षित घटनेने कशी खळबळ उडते? याची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. आणि ही उलथापालथ निस्तरताना त्यांची मैत्री कशी खुलते, हे मजेशीर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक योगेश जाधव यांनी या चित्रपटामधून केला आहे.

आणखी वाचा – “जर मुलगी झाली असती तर…”, डिलिव्हरीनंतर रेणुका शहाणेला नातेवाईकांकडून वाईट अनुभव, म्हणाली, “वजन कमी करायला…”

चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. पटकथा, संवाद प्रियदर्शन जाधव यांनी लिहिले आहेत. संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केले आहे. तर गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी ‘ऑल इज वेल’ चित्रपटातील गाणी गायली आहेत. प्रियदर्शन, अभिनय, रोहित हे जबरदस्त त्रिकुट २७ जूनला ‘ऑल इज वेल’ म्हणत चित्रपटगृहात धुडगूस घालायला सज्ज होत आहेत.

Tags: All Is Wellentertainmentmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Ankita Walavalkar trauma

“तेव्हा कोणीतरी अतिप्रसंग करतं आणि...”, भांडी घासण्याच्या ट्रॉमावरुन अंकिता वालावलकरचं स्पष्टीकरण, म्हणाली, “थट्टा केली पण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.