सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत आमूलाग्र बदल झाला. तमाशापटांची जागा आता विनोदीपटांनी घेतली आणि अस्सल गावरान मातीतला विनोद घेऊन दादा कोंडके नावाचे अवलिया मराठी चित्रपटसृष्टीत अवतरले. १९६९ साली ‘तांबडी माती’ हा चित्रपट घेऊन रुपेरी पडद्यावर आले आणि मराठी चित्रपटसृष्टी अजरामर केली. मराठी चित्रपटसृष्टीला अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक दादा कोंडके हे अनमोल रत्न दिले. अश्या या अनमोल रत्नाचे नाव गेली ५० वर्ष मराठी चित्रपटांवर राज्य करत असून आजही हे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. केवळ त्याकाळातली तरुणाई नव्हे, तर वयाची साठी ओलांडलेले प्रेक्षकही दादांच्या चित्रपटांचे वेडे होते. (dada kondke)
अश्या या अजरामर अभिनेत्याच्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली, त्या ज्युबिलीस्टार दादा कोंडकेंचे चित्रपट पाहण्यासाठी आजची तरुणाई सज्ज असून त्यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्ताने मराठी चित्रपट वाहिनी ‘झी टॉकीज’ त्यांच्या सिल्वर ज्युबिली ६ चित्रपटांद्वारे दादा कोंडके यांना मानाचा मुजरा करण्यासाठी सज्ज झाले आहे. (jubilee star dada on zee talkies)
झी टॉकीजवर पाहता येणार दादा कोंडकेंचे ६ ‘सिल्वर ज्युबिली’ चित्रपट (jubilee star dada kondke on zee talkies)
८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडके यांचा १९६९ साली ‘तांबडी माती’ पहिला चित्रपट आला. त्यानंतर त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले, ज्यात ‘सासरचं धोतर’, ‘राम राम गंगाराम’, ‘ह्योच नवरा पाहिजे’ अशी अनेक चित्रपटांची नावे घेता येईल. दादांची ही ६ ब्लॉकबस्टर चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून ६ ऑगस्टपासून दर रविवारी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता दादा कोंडके यांचे ब्लॉकबस्टर चित्रपटांतून विनोदाच्या श्रावणसरी बरसणार आहेत. झी टॉकीजमुळे विनोदाच्या सम्राटाला पुन्हा भेटण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार असून यानिमित्ताने ज्युबिलीस्टार दादा कोंडके यांच्या अनेक आठवणींनाही उजाळा मिळणार आहे.
दादा कोंडके यांनी त्यांच्या कारकीर्दीत एकूण १६ चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन व अभिनय केले, त्यातील जवळपास सर्वच चित्रपट सिल्वर ज्युबिली ठरले. दादांचा नवा चित्रपट प्रदर्शित होताच तो सिल्वर ज्युबिली साजरी करूनच जायचा. याच समीकरणामुळे दादांचे सलग ९ चित्रपटांनी सिल्वर ज्युबिली साजरी करत “गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये नाव नोंदवले गेले. त्यातूनच दादांच्या चित्रपटांना ज्युबिलीस्टार चित्रपट अशी ओळख मिळाली. याचं कारण म्हणजे, चित्रपटाची कथा, संवाद, दिग्दर्शन, गाण्यांची निवड आणि दादांच्या विनोदाचे अजब रसायन. दादांनी प्रेक्षकांना जितके खळखळून हसवले, तितकेच त्यांनी अलगद रडवलेही. त्यामुळे विनोदी चित्रपटांनाही कारूण्याची किनार कशी द्यायची, याची नस दादांना सापडली होती.
हे देखील वाचा : दादा कोंडकेंचे ‘हे’ १२ चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार ! मुंबई हायकोर्टाने दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
त्यामुळेच दादांच्या चित्रपटांची हीच संपूर्ण पर्वणी झी टॉकीज घेऊन आली आहे. “अख्खा महाराष्ट्र हसणार खदाखदा… सुपरहिट चित्रपटांचा वादा, झी टॉकीजवर ज्युबिलीस्टार दादा” असं म्हणत झी टॉकीज वाहिनी दादा कोंडके यांच्या स्मृती जागवणार आहेत. (jubilee star dada on zee talkies)