प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा व्यक्ती कायम असतो जो प्रत्येक वळणावर त्याच्या सोबत असेल. मनोरंजनविश्वात असे बरेच कलाकार मंडळी आहेत ज्यांच्या आयुष्यातील खास व्यक्ती आणि त्याच्या सोबतच्या आठवणी देखील तेवढ्याच खास आहेत. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत देखील काही अशा प्रेमळ जोड्या आपण पाहिल्या ज्याच्या लव्हस्टोरीज देखील तितक्याच खास आहेत. आधी रोहित माने, वनिता खरात, दत्तू मोरे यांच्या लव्हस्टोरी बद्दल आपण जाणून घेतलं. इट्स मज्जाच्या माझ्या घराची गोष्ट या भागात सचिन मोटे यांनी त्यांच्या प्रेमकहाणी बद्दल सांगितलं आहे.(sachin mote wife)
सचिन मोटे यांना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता. त्यांनी सांगितलं त्यांची आणि मेघा यांची भेट पहिल्यांदा विद्यापीठात झाली. त्यावेळी ते तिथे समन्वयक होते आणि वर्षा त्याच विद्यापीठात शिक्षण घेत होत्या. विद्यापीठातील ओळखी नंतरपुढे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सचिन आणि मेघा यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात विरोधातून झाली असं त्यांचं म्हणणं होतं.
सचिन यांच्या घरातून या लग्नाला परवानगी होती. जेव्हा सचिन यांनी मेघा यांचा फोटो त्यांच्या घरच्यांना दाखवला तेव्हा फोटो पाहूनच मोटे कुटुंब खुश झालं आणि लग्नाला परवानगी दिली. परंतु मेघा यांच्या घरातून सुरुवातीला विरोध होता. विरोध पत्करून सचिन आणि वर्षा यांनी लग्न केलं. परंतु काही दिवसांमध्ये त्यांचे आणि मेघा यांच्या घरच्यांचे संबंध पूर्वरत झाले आणि दोन्ही कुटुंब आनंदात राहू लागलं.(sachin mote lovestory)
हे देखील वाचा – सचिन मोटेंनी बायकोसोबत पाहिलंय हे स्वप्न
सचिन मोटे पत्नी बद्दल सांगताना म्हणले माझ्या आयुष्यात तिचं खूप महत्व आहे. माझ्या प्रत्येक संघर्षाच्या काळात ती माझ्या सोबत उभी असते. सचिन मोटे यांनी इट्स मज्जाच्या माझ्या घराची गोष्ट या कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केला आहे. त्या सोबतच हास्यजत्रेबाबत ही त्यांनी अनेक आठवणी हा खास कार्यक्रमात सांगितल्या आहेत.(sachin mote hasya jatra)