झी मराठी वाहिनी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत आहे. मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. अशातच आता मालिकेत आणखी एक नवीन ट्विस्ट येणार आहे. (Satvya Mulichi Satavi Mulagi New Promo)
या मालिकेच्या आगामी भागाचा एक नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये, नेत्राला एक पेटी सापडली आहे. या पेटीतील एका पानावर लिहिलेल्या लिपीविषयी तिला काही माहित नाही. त्या लिपीविषयी नेत्रा अद्वैतला विचारते आणि यावर अद्वैत तिला ती सर्पलिपी असल्याचे सांगतो. यापुढे अद्वैतला सर्पदंश होताना दिसत आहे. यानंतर अद्वैत नेत्राला “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी मृत्यूला सामोरे जायला आणि विरोचक म्हणून तुझ्यासाठी मरायला तयार आहे” असं या प्रोमोमध्ये म्हणताना दिसत आहे.
आणखी वाचा – ‘झिम्मा २’ मधील ‘हा’ परदेशी अभिनेता नेमका आहे तरी कोण? खुद्द हेमंत ढोमेने केला खुलासा, म्हणाला, “आपली भाषा…”
येत्या रविवारी या मालिकेचा महाएपिसोड प्रदर्शित होणार असून या भागात प्रेक्षकांसमोर सर्पनितीचं रहस्य उलगडणार आहे. सर्पनिती म्हणजे काय? याचा उलगडा प्रेक्षकांना या महाएपिसोडमधून होणार आहे. त्याचबरोबर या सर्पनितीमुळे मालिकेच्या कथानकात आणखी कोणता नवीन ट्वीस्ट येणार? तसेच या सर्पनितीमुळे अद्वैत व नेत्रा यांच्या नात्यावर काय परिणाम होणार? या दोघांच्या नात्यासह इतरांच्या आयुष्यावरदेखील काय परिणाम होणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, मालिकेतील या नवीन ट्विस्टसाठी मालिकाप्रेमी उत्सुक आहेत. या प्रोमोखाली प्रेक्षकांनी अनेक कमेंट करत या ट्विस्टविषयी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या नवीन ट्विस्टमुळे मालिका संपणार तर नाही ना? असा प्रश्नही काही चाहत्यांनी निर्माण केला आहे. त्यामुळे येत्या महाएपिसोडसाठी प्रेक्षक आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे.