बॉलिवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूरच्या ज्या चित्रपटाची आवर्जुन वाट पाहिली जात होती तो चित्रपट म्हणजे ‘ॲनिमल’. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. आता हा चित्रपट १ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याअगोदर चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळाली. आता यादरम्यानचा, रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याच्या नवीन टॅटू दाखवताना दिसत आहे. (ranbir Kapoor gets new tattoo of daughters raha)
रणबीर कपूर नुकताच तेलुगू सुपरस्टार नंदामुरी बालकृष्णाने होस्ट केलेल्या एनबीकेबरोबरच्या ‘अनस्टॉपेबल’ या शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये त्याने बऱ्याच गोष्टींबाबात वक्तव्य केलं होतं. त्यातील एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रणबीर त्याच्या व आलियाच्या लेकीच्या नावाचा म्हणजेच राहाच्या नावाचा टॅटू दाखवताना दिसत आहे. जो त्याने नुकताच त्याच्या खांद्यावर काढला आहे. रणबीर व आलियाच्या मुलीचा जन्म नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता.
Ranbir Kapoor got a tattoo of Raha's name on his shoulder ❤️ #UnstoppableWithNBKpic.twitter.com/SvJjJ0PO48
— RKᴬ (@seeuatthemovie) November 24, 2023
रणबीरने २०२२च्या सुरुवातीला ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याला त्याच्या टॅटूबाबत प्रश्न विचारलं होतं. तेव्हा त्याने आपल्याकडे कोणताच टॅटू नसल्याचं सांगितलं होतं. तसंच तो लवकरच टॅटू काढणार असल्याचा खुलासाही केला होता. त्यावेळी रणबीर म्हणाला होता की, कदाचित तो टॅटू माझ्या मुलीच्या नावाचा असू शकतो.
काही दिवसांपूर्वी त्याने झूमच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर संवाद साधला होता. त्यावेळी त्याने खुलासा केला होता की, राहाचा फोटोज त्याने मीडियाला दाखवला तर आलिया त्याला मारुन टाकेल. याबरोबर त्याने हे स्पष्ट केलं होतं की, जेव्हा तो कुठेही जातो, ती एकमेव व्यक्ती असते जिच्याबद्दल मी बोलतो आणि मी प्रत्येकाला तिथे विचारतो तुम्हाला माझ्या मुलीला बघायचं आहे का? त्यामुळे रणबीर आपल्या मुलीवर बरंच प्रेम करताना दिसतो आणि त्याने गोंदवलेल्या टॅटूमुळे त्याचं पालकत्व व्यक्त करताना दिसतो.