झी मराठी वाहिनी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेतील रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस रोमांचक व रहस्यमय होत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. अशातच आता मालिकेत आणखी एक वळण आले आहे. नुकताच मालिकेचा एक् नवीन प्रोमो समोर आला असून यामुळे चाहत्यांची अपेक्षा वाढली आहे. (Satvya Mulichi Satvi Mulgee New Promo)
झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात अद्वैत नेत्राला मारणार असल्याचे दिसत आहे. अद्वैत इंद्राणी व नेत्राकडे रागाने बघत असतो. यादरम्यान त्याचे डोळे लाल झाल्याचे दिसत आहे आणि तो खुपच रागात आहे. याच रागात तो अचानक नेत्रावर हल्ला करतो. नेत्राचा गळा दाबत तो तिला मारण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच हा व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये अद्वैत नेत्रावर हल्ला करणार असेही म्हटले आहे. त्यामुळे तो खरंच नेत्राचा जीव घेणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
मालिकेत आतापर्यंत दोन पेट्यांचा उलगडा झाल्यानंतर आता तिसरी पेटीचाही उलगडा झाला आहे. तसेच या पेटीतून उलगडणाऱ्या रहस्यामुळे नेत्रा व अद्वैतच्या नात्यामध्ये बदल होणार का?, तसेच पेटीमधल्या मजकुरावर लिहिलेली सर्पलिपी वाचायला त्यांची मदत कोण करणार? या प्रश्नांचीही उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत.
दरम्यान, या व्हिडीओत अद्वैत नेत्रावर हल्ला करताना दिसत असल्यामुळे तो खरच नेत्राचा जीव घेणार का? की हे एक स्वप्न असणार आहे? याचा उलगडा येणाऱ्या आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता लागली आहे. तसेच या व्हिडीओखाली प्रेक्षकांनीदेखील कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. आणि अद्वैतच्या अशा वागण्यामुळे मालिकेत आता काय नवीन ट्विस्ट येणार? याची चाहत्यांना सुद्धा उत्सुकता लागली आहे.