रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कौन बनेगा करोडपती’ला मिळाला ‘सगळ्यात लहान करोडपती’, एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का?

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 29, 2023 | 6:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kaun banega crorepati season 15 12 year old mayank won 1 crore rupees know what was the question

‘कौन बनेगा करोडपती’ला मिळाला ‘सगळ्यात लहान करोडपती’, एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का?

टीव्हीवरील काही लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानातही भर घालत आहे. या कार्यक्रमात येणारे अनेक स्पर्धक ही त्यांची काही स्वप्ने घेऊन येतात आणि या मंचावरून त्यांच्या स्वप्नपूर्तीकडे प्रवास करतात. सध्या या कार्यक्रमात ‘केबीसी ज्युनियर्स वीक’ अर्थातच लहान मुलांचा विशेष सप्ताह सुरु आहे. यात अनेक लहान व हुशार मुलं सहभागी होत आपली हुशारी दाखवत आहेत. (Kaun Banega Crorepati Youngest Crorepati Mayank)

या ज्युनिअर्स वीक मध्ये हरियाणातील महेंद्रगड येथील १३ वर्षांच्या मयंकने सहभाग घेतला होता. आपल्या हुषारीने त्याने या स्पर्धेत आपलं नशीब आजमावले आहे. मयंकने हॉट सीटवर आपली जागा आणि आपल्या हूशारीने करोडोंची रक्कमही जिंकली. यावेळी अमिताभ यांनी मयंकबरोबर कोडिंग व ए. आयसारख्या आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाविषयी चर्चा केली.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

आणखी वाचा – “माझं सगळं आयुष्य…”, गर्लफ्रेंडची प्रथमेश परबसाठी पोस्ट, वाढदिवसही केला जोरदार सेलिब्रेट, म्हणाली, “तुझ्यासाठी…”

यावेळी बिग बी मयंकला “२०२३ मध्ये वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्घाटन झालेल्या ‘समानतेचा पुतळा’ कोणाच्या नावावर आहे?” हा ६ लाख ४० हजार रुपयांसाठीचा प्रश्न विचारतात. यावर मयंक डॉ. भीमराव आंबेडकर असे बरोब उत्तर देतो. यानंतर ते या खेळातील १२ लाख ५० हजार रुपयांसाठीचा प्रश्न विचारतात. यावर मयंक प्रेक्षकांचा कौल घेत या प्रश्नाचे उत्तर देतो. यापुढे पुन्हा बिग बी त्याला २५ व ५० लाख रुपयांसाठीचे पुढचे प्रश्न विचारात. यांची बरोबर उत्तारे देत मयंक या खेळात यशस्वीपणे पुढे जातो.

आणखी वाचा – Video : …अन् थिएटरमध्ये प्रेक्षकांमध्ये बेभान होऊन नाचल्या निर्मिती सावंत, जमली तुफान गर्दी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

यानंतर बिग बी मयंकला “नव्याने शोधलेल्या खंडाला ‘अमेरिका’ असे नाव देणारा नकाशा तयार करण्याचे श्रेय कोणत्या युरोपियन कार्टोग्राफरला जाते? हा एक कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारतात. याचे उत्तर देण्यासाठी तो तज्ज्ञाची मदत घेतो आणि “मार्टिन वाल्डसीमुलर” असे उत्तर देतो. त्याच्या या उत्तरावर बिग बी लगेच “मयंक हा कौन बनेगा करोडपती या शोचा पहिला ज्युनिअर करोडपती आहे” असं म्हणत त्याला मिठी मारतात. यावेळी मयंकचे आईवडील भावुक झाल्याचेदेखील पाहायला मिळाले.

Tags: entertainmententertainment newskaun banega crorepati 15
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Marathi Movie Release Update

एकाच दिवशी चार मोठे मराठी चित्रपट होणार प्रदर्शित, गौरव मोरे-नम्रता संभेरावच्या चित्रपटामध्ये टक्कर, कोणाला अधिक प्रतिसाद मिळणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.