‘झी मराठी’ वाहिनीवर सध्या सुरु असलेली ‘शिवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत शिवा हे पात्र अभिनेत्री पूर्वा फडके महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत पूर्वा फडके व शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. शिवा या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळणे आलेली पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या शिवाच्या धाकट्या बहिणीची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. (Shiva Serial New Promo)
शिवाच्या बहिणीचं लग्न आशुबरोबर ठरलं असलेलं पाहायला मिळत. दिशा व आशुचा घरच्याघरीच साखरपुडा समारंभही झाला आहे. तर प्रेम नसतानाही केवळ पैशासाठी दिशा आशुबरोबर लग्न करायला तयार होते. दिशाचं बाहेर अफेअर असूनही ती आशूच्या घरची परिस्थिती पाहून लग्नाला होकार देते. तर एकीकडे आशूची बहीण या लग्नाला तयार नसते. आशूची बहीण लग्न मोडण्यासाठी अडथळे आणताना दिसते. दिशाच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांना हे लग्न थाटामाटात करणं शक्य नसतं. अशावेळी आशूची बहीण त्यांच्या घरी येऊन पाच तोळे सोन्याची मागणी करते आणि ते नाही दिल्यास हे लग्न होणार नाही असंही सांगते.
हे ऐकून दिशाच्या आईला व आजीला खूप टेन्शन येतं. दिशा मात्र त्यांच्याजवळ खोत सांगते की, आशूनेही पाच तोळे सोन्याची मागणी केली आहे. यावेळी तिथे शिवा येते. आणि ती पाच तोळे सोन्याची व्यवस्था करेल असं सांगते. हे ऐकून घरातल्यांना धक्का बसतो. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, शिवा तिचं एकमेव गॅरेज व बाबांची असलेली एकमेव आठवण बहिणीच्या लग्नासाठी गहाण ठेवायचा निर्णय घेते. हे ऐकून तिची आजी याला विरोध करते.
आता दिशाच्या लग्नासाठी खरंच शिवा गॅरेज गहाण ठेवणार का? शिवाने गॅरेज गहाण ठेवल्यानंतर पन्ना गॅंगचं काय होणार? आशुला ही गोष्ट कळणार का? हे सर्व मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे.