शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऐकावं ते नवलंच! बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडूनच रणवीर सिंह बाळाला सांभाळण्याचे घेत आहे धडे, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 22, 2024 | 11:54 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ranveer singh and ranbir kapoor

ऐकावं ते नवलंच! बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडूनच रणवीर सिंह बाळाला सांभाळण्याचे घेत आहे धडे, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांनी काही दिवसांपूर्वीच चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. दोघांनी आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज सोशल मीडियावरुन शेअर केली. त्यावेळी दोघांवर शुभेच्छांचा भरभरुन वर्षावही झालेला पाहायला मिळाला. २९ फेब्रुवारी रोजी दोघांनी ही आनंदाची बातमी वेगळ्या पद्धतीने दिली. रणवीर-दीपिका सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार असल्याचे पोस्टच्या माध्यमातून समोर आले आहे. अशातच रणवीर सिंगने आतापासूनच तयारी सुरु केली असल्याचं समोर आलं आहे. (ranveer singh and ranbir kapoor)

अभिनेत्याने रणबीर कपूरकडून चांगला वडील बनण्यासाठी टिप्स घेतल्या आहेत. रणबीर कपूर व आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षीच एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचे नाव राहा कपूर असे आहे. यानंतर आता रणवीर सिंग आता वडील होणार आहे. अलीकडेच रणवीर व रणबीर यांनी अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी पार्टीतील एका व्यक्तीने बॉलीवूड लाईफला सांगितले की, रणवीर सिंग हा रणबीर कपूरच्या वडील झाल्यानंतरच्या प्रवासाने खूप प्रभावित झाला होता आणि याबाबत दोघांनी याबद्दल खूप चर्चा केली.

आणखी वाचा – यंदाची होळी गाजणार! ‘तू माझी पुरणपोळी रे’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, सौरभ चौघुले व योगिता चव्हाणच्या डान्सने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

सूत्राने सांगितले की, रणवीर सिंगने रणबीर कपूरकडून पालकत्वाच्या टिप्स घेतल्या. आपल्या मुलीच्या आगमनानंतर रणबीरने पॅरेंटल रजा घेतल्याने रणवीरही खूप प्रभावित झाला होता. आता रणवीर सिंगही असेच करण्याचा विचार करत असल्याची बातमी आहे. रणवीरला ब्रेक घ्यायचा आहे आणि संपूर्ण गरोदरपणात पत्नी दीपिकाची काळजी घ्यायची आहे.

आणखी वाचा – ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न मोडल्याचे दुःख सहन होईना, तीन मुलं असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडली अन्…; दारुचं व्यसन आणि गरिबीत काढलं आयुष्य

‘बॉलीवूड लाइफ’ला या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, रणवीर सिंग दीपिका आणि त्यांच्या बाळाबरोबर राहण्यासाठी एक वर्षाची प्रसूती रजा घेण्याचा विचार करत आहे. दीपिका पदुकोणनेही प्रसूती रजा घेण्याची तयारी केली आहे. रणवीर सिंगने पुढच्या वर्षी ‘डॉन ३’, ‘शक्तिमान’ आणि आदित्य धरचे ॲक्शन चित्रपट सुरु होण्यापूर्वी कोणताही प्रोजेक्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून तो दीपिका आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाबरोबर वेळ घालवू शकेल.

Tags: entertainmentranbir kapoor daughterranveer singh and deeoika padukoneranveer singh and ranbir kapoor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vaishnavi Hagawane Death Case
Social

बेडरुममध्ये कॅमेरा, पत्नीबरोबर लाईट सुरु ठेवत शारीरिक संबंध अन्…; हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणचे काळे धंदे, संपूर्ण प्रकार उघड

मे 23, 2025 | 5:25 pm
Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Next Post
allu arjun viral photo

सुपरस्टार अल्लू अर्जुन पोलिसांच्या ताब्यात? फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण, अखेर सत्य आलं समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.