‘झी मराठी’ वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करताना दिसत असते. या मालिकेने आजवर वेगवेगळे कथानक घेऊन येत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अशातच सध्या या वाहिनीवरील जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला असून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. या नव्या मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरल्या आहेत. ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ यांसारख्या अनेक मालिका झी मराठी वाहिनीवर आल्या आहेत. (zee Marathi Serial Troll)
या मालिकांच्या यादीत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अक्षरा व अधिपतीची जोडी या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. तर अधिपतीची आई भुवनेश्वरी या मालिकेत नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहे. अक्षरावरील रागापोटी भुवनेश्वरी प्रत्येक वेळी खेळी खेळताना दिसत आहे. अक्षरा-अधिपती एकत्र येऊ नयेत म्हणून भुवनेश्वरीचे अथक प्रयत्न मालिकेत पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, झी मराठी वाहिनीवर नकारात्मक पात्रांना अधिक महत्त्व दिल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. तसेच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रोमो समोर आला असून यांत अधिपती त्याच्या आईच्या शब्दाबाहेर नसलेला दिसत आहे, त्यामुळे नकारात्मक पात्राला अधिक महत्त्व दिल्याने प्रेक्षकांनी मालिकेला आणि वहिनीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी कमेंट करत, सत्य जिंकताना दाखवण्याऐवजी असत्याचा विजय दाखवतात, असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.
एका नेटकऱ्याने या प्रोमोखाली कमेंट करत, “सुरवातीला सर्वात जास्त आवडणारी मालिका आता बोरिंग वाटतं आहे . कारण इथे निगेटिव्ह लोक जिंकताना पाहावं वाटतं नाही. सत्य जिंकतं तेव्हा आनंद होतो पण झी मराठी वाले सतत खोटं जिंकवतात”. तर आणखी एका युजरने, “मालिकेला थोडंसं चांगलं वळण द्या. निगेटिव्ह रोलच्या बाजूने सगळं सुरु आहे”, असं म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत, “काहीतरीच जगावेगळं दाखवतात एवढं कोणी नसतं. शिक्षणाचा हक्क सर्वांना आहे. अधिपती एवढा बिनडोक का दाखवला. इतकंच नाही तर झी मराठीच्या सगळ्या मालिकांचे नायक-नायिका बिनडोक का दाखवले आहेत”, असं म्हटलं आहे.