शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

झहीर इक्बालला सोनाक्षीबरोबर पळून जाऊन करायचे होते लग्न, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा, म्हणाला “आपल्या देशात…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 23, 2024 | 10:24 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Zaheer Iqbal revealed that he wanted to elope and get married with Sonakshi Sinha know more

झहीर इक्बालला सोनाक्षीबरोबर पळून जाऊन करायचे होते लग्न, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा, म्हणाला “आपल्या देशात...”

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. गेले काही दिवस तिच्या लग्नाबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या आणि अखेर ती बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय उपस्थित होते. गेल्या महिन्यात २३ जून रोजी त्यांचे लग्न पार पडले होते.  नोंदणीकृत लग्नानंतर, त्याचदिवशी संध्याकाळी एक रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. मात्र झहीरचा सोनाक्षीला पळवून नेत लग्न करण्याचा विचार होता.

झहीरने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, त्याचे लग्नाचे नियोजन सोनाक्षीपेक्षा खूपच वेगळे होते. त्याला देशातून पळून जाऊन लग्न करायचं होतं. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी ‘गलाट्टा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाच्या नियोजनाबद्दल खुलासा केला. सोनाक्षी म्हणाली की, तिला कायम घरातील सर्व कुटुंबियांबरोबर लग्न करायचे स्वप्न होते. पण नंतर झहीरने तिला अडवले आणि असं म्हटलं की, “मला पळून जायचे होते. देशाबाहेर कुठेतरी जाणे, लग्न करून परत येणे, पण मला कळले की, असे लग्न भारतात वैध नाही”.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

आणखी वाचा – Video : राहत फतेह अली खान यांना दुबईत अटक झाल्याचे वृत्त खोटे? स्वतः व्हिडीओ शेअर करत सांगितली सत्य परिस्थिती, नेमकं प्रकरण काय?

तसेच सोनाक्षीने सांगितले की, तिला एक छोटेसे लग्न करायचे होते. अभिनेत्रीने सांगितले की, तिला तिच्या लग्नात नातेवाईक आणि मित्रांनी उपस्थित राहावं असं नेहमीच वाटत होतं. लग्नात आपल्या आयुष्याचा एक भाग असलेल्या सर्व लोकांना सामील करून घ्यायचे होते, असेही ती म्हणाली.

आणखी वाचा – कन्या, कुंभ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस जोखीमेचा, नोकरी-व्यवसायात सावध राहिल्यास फोईल फायदा, जाणून घ्या…

दरम्यान, ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी व झहीरने गेल्या महिन्यात लग्न केले. सोनाक्षीच्या अपार्टमेंटमध्ये हा विवाहसोहळा पार पडला, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. नोंदणी पद्धतीने त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला होता.

Tags: Bollywood entertainment newsentertainment newssonakshi SinhaZaheer Iqbal
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Shivsena MLA Manisha Kayande demanded action on the intimate video of Armaan and Kritika Malik.

अरमान-कृतिकाच्या ‘त्या’ व्हिडीओवर शिवसेना आमदार मनीषा कायंदेंची कारवाईची मागणी, म्हणाल्या, “अश्लीलतेच्या मर्यादा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.